बापरे! देशात ६.२ कोटी भटके कुत्रे

163

कुत्रे, मांजरांसारख्या पाळीव प्राण्यांच्या संगोपनासाठी अनेक संस्था कार्यरत आहेत. खरे तर, कुत्रे-मांजरी हा अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. भारतातील कलाकार, प्रतिष्ठीत व्यक्ती पाळीव प्राण्यांचे संगोपन करण्याचे कायम आवाहन करतात. पण भटक्या प्राण्यांच्या वाढत्या आकडेवारीमुळे ‘ऑल पेट्स वॉंटेड’ निर्देशांकांत भारताला कमी गुण मिळाले आहेत. भारतात सुमारे ६.२ कोटी भटके कुत्रे, तर ९१ लाख भटक्या मांजरी आहेत. देशातील ७७% लोकांनी दिलेल्या प्रतिक्रियेनुसार जवळपास आठवड्यातून एकदा तरी भटका कुत्रा दृष्टीस पडतो, असे अहवालमार्फत समोर आले आहे.

भारताला मिळाले कमी गुण

‘द स्टेट ऑफ पेट होमलेसनेस इंडेक्स’ या अहवालातून भारतातील वाढत्या भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर प्रकाश टाकण्यात आला आहे. यामुळेच ‘ऑल पेट्स वॉंटेड’ निर्देशांकांत भारताला १० पैकी केवळ २.४ गुण मिळवता आले आहेत. देशात एकूण ८ कोटी भटके कुत्रे व मांजरे आहेत. तर भारतातील ८५% पाळीव प्राण्यांना त्यांच्या मालकांनीच सोडून दिले, असेही या अहवालात नमूद केले आहे. ही परिस्थिती चिंताजनक असल्याचे मत तज्ज्ञांनी नोंदवले आहे.

( हेही वाचा : साता-यात बिबट्या जेरबंद )

जगभरातील परिस्थिती

चीनमध्येे भटक्या प्राण्यांची संख्या ७.५ कोटी, अमेरिकेत ही संख्या ४.८ कोटी, जर्मनीत २०.६ लाख, ग्रीसमध्ये २० लाख, तर ब्रिटनमध्ये ११ लाख भटके कुत्रे आणि मांजरे आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.