राज्यात गेल्या कित्येक दिवसांपासून एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. सरकारने कर्मचाऱ्यांना वेतनवाढ करून दिली तरीही विलिनीकरणाच्या मागणीवर महाराष्ट्र परिवहन महामंडळाचे कर्मचारी ठाम आहेत. विलिनीकरणाच्या मागणीवर त्रिसदस्यीय समितीचीदेखील स्थापना करण्यात आली आहे. तरीही संप कायम सुरू असल्यामुळे राज्यात काही ठिकाणी या संपाला हिंसक वळण आले आहे. कर्मचारी आपल्याच एसटी गाड्यांवर दगडफेक करत असल्याच्या घटना घडल्यामुळे, ‘एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांना हे वागणं बरं नव्हे’, असं सांगत भावनिक सल्ला दिला आहे.
मायमाऊलीवर कोण दगड मारतं का?
जामनेरहून जळगावला परतणाऱ्या एसटीवर जामनेर आगारातील वाहकानेच दगडफेक केल्याने, वाहकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यावर एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांना हे वागणं बरं नव्हे, असे सांगत ‘आपल्याच मायमाऊलीवर कोण दगड मारतं का’, असा सवाल केला आहे. एसटी म्हणजे रोजीरोटी त्यामुळे आपल्या मायमाऊलीचे नुकसान करणे योग्य नाही, असा सल्ला महामंडळाने दिला आहे.
कर्मचारी बंधू भगिनींनो… हे वागणं बरं नव्हे..!
.
.#msrtc#msrtcofficial pic.twitter.com/nA7BpVbSUy— Maharashtra State Road Transport Corporation (@msrtcofficial) November 28, 2021
( हेही वाचा : मंत्री आव्हाड म्हणतात, पान सुपारी, गुटखा, पान मसाला खा! )
संमिश्र प्रतिक्रिया
एसटीच्या या आवाहनाला संमिश्र प्रतिक्रिया मिळत असून, कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येला जबाबदार कोण? असा उलट सवाल एसटी महामंडळाला करण्यात आला आहे. तर काही लोकांनी एसटीवर दगडफेक करणे चुकीचे आहे, असेही मत व्यक्त केले आहे.
Join Our WhatsApp Community