बेकारीला कंटाळून नाशिकमधील अभियंत्याची आत्महत्या

150

नाशिक शहरातील गोदावरी गंगा आर के या ठिकाणी असलेल्या व्हिक्टोरिया पुलावरून एका अभियंत्याने उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव मिलिंद भास्कर मराठे, वय वर्ष 57 असे आहे.  पारिजात नगर गंगापूर रोड, नाशिक येथे राहणारे मराठे हे इंजिनिअर म्हणून एका कंपनीत काम करत होते. गेल्या दोन वर्षापासून कोरोना काळापासून काम सुटल्याने मानसिक संतुलन बिघडून त्यांची आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.

(हेही वाचा महाविकास आघाडी सरकार ‘तीन पैशांचा तमाशा’ नाटकाप्रमाणे!)

नाशिक महानगरपालिकेने व्हिक्टोरिया पूलावरती सुरक्षा म्हणून थोड्या उंचीची भिंत किंवा जाळी लावण्यात यावी, यामुळे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तींचे प्रमाण कमी होईल, अशी मागणी नागरिक करत आहे. घटनेची माहिती पंचवटी पोलिसांना मिळताच पंचवटी पोलिस ठाण्याचे एपीआय नेमाने, पोलिस नाईक धनराज पाटील, पोलिस नाईक अरुण चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून मृतदेह पोस्टमार्टमसाठी शासकीय जिल्हा रुग्णालयात पाठवले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.