नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे (NFHS) च्या ताज्या निष्कर्षांवरून असे दिसून आले आहे की 14 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 30% महिलांनीच ठराविक परिस्थितीत नव-याने आपल्या बायकोला मारहाण करण्याचे समर्थन केले आहे.
30 टक्के महिलांनी केले समर्थन
या सर्वेवरुन असे दिसून आले की, तेलंगणा 84 टक्के, आंध्र प्रदेश 84 टक्के आणि कर्नाटक 77 टक्के या तीन राज्यांमधील 75 टक्क्यांपेक्षा जास्त महिलांनी नव-याने आपल्या पत्नीला मारण्याचे समर्थन केले आहे. तर, मणिपूर (66%), केरळ (52%), जम्मू आणि काश्मीर (49%), महाराष्ट्र (44%) आणि पश्चिम बंगाल (42%) या राज्यांतील महिला पुरुषांनी आपल्या पत्नीला मारहाण करणे न्याय्य ठरवले आहे. या सर्वेक्षणात महिलांना प्रश्न करण्यात आला की, “तुमच्या मते, पतीने पत्नीला मारणे किंवा मारहाण करणे योग्य आहे का?”. 14 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 30% पेक्षा जास्त महिलांनी “होय’ असे म्हटले आहे.
हिमाचल प्रदेश, केरळ, मणिपूर, गुजरात, नागालँड, गोवा, बिहार, कर्नाटक, आसाम, महाराष्ट्र, तेलंगणा, नागालँड आणि पश्चिम बंगालमधील महिलांनी असे अधोरेखित केले की ‘सासरचा अनादर’ हे नव-याने आपल्या पत्नीला मारहाण करण्याचे प्राथमिक कारण आहे. हिमाचल प्रदेशातील केवळ 14.8% महिलांनी नव-याने पत्नीला मारहाण करण्याचे समर्थन केले.
का केली जाते मारहाण
या महिलांनी नव-याने पत्नीला मारहाण करण्याची काही कारणं सांगितली आहेत..
- घराकडे दुर्लक्ष करणे
- सासरच्या लोकांचा अनादर करणे
- विश्वासघात करणे
- वाद घालणे
- लैंगिक संबंधास नकार देणे
- पतीला न सांगता बाहेर जाणे
- घराकडे दुर्लक्ष करणे
- चविष्ट स्वयंपाक न बनवता येणे
(हेही वाचा: महाराष्ट्राची वाढली चिंता! आफ्रिकेहून डोंबिवलीत आलेला तरुण कोरोनाबाधित )
Join Our WhatsApp Community