नव्या विषाणूला ओमिक्रॉन नाव कसे पडले? जाणून घ्या…

144

कोरोना विषाणूच्या नवीन प्रकाराला ‘ओमिक्रॉन’, असे नाव देण्यात आले आहे. पण का? कारण कोरोनाचे 12 व्हेरिएंट उपलब्ध आहेत. त्याच्या पुढचे म्हणजेच 13 (Nu) आणि 14 (Xi) हे नंबर रिकामे असताना, या नव्या विषाणूला
ग्रीक अक्षरांत 15 व्या स्थानी येणा-या ओमिक्रोन या शब्दावर नाव का ठेवण्यात आले, असा प्रश्न आता डब्लूएचओला विचारला जात आहे. यावर डब्लूएचओने तर्कसंगत उत्तर दिले आहे. पण डब्लूएचओने ज्या कारणांसाठी या अक्षरांची निवड केली त्याची लोक आता खिल्ली उडवत आहेत.

का केली निवड? 

कोरोनाचे बारा व्हेरिएंट हे ग्रीक अक्षरांवर आधारित आहेत. त्यातील अल्फा, बीटा, गामा, डेल्टा, एप्सिलोन, जेटा, एटा, थीटा, आयोटा, कप्पा, लिम्ब्डा आणि मू हे आहेत. पण जगाच्या आरोग्याची काळजी घेणा-या डब्लूएचओने या बारा अक्षरांनंतर येणारी 13 (Nu) आणि 14 (Xi) ही अक्षर सोडून थेट 15 व्या नंबरवर असलेल्या ओमिक्रोन या अक्षराची निवड केली आहे.

(हेही वाचा निर्बंध लावण्याआधी विरोधकांना विश्वासात घ्या!)

डब्लूएचओचे प्रवक्ता तारिक जसारेविक यांनी सांगितले की, नू (Nu) आणि शी (Xi) ही अक्षर खूप कॅामन आहेत. काही देशांमध्ये या अक्षरांचा उपयोग नावांच्या मागे पुढे केला जातो. आणि डब्लूएचओचा नियम आहे की, कोणीही व्यक्ती, संस्था, समाज, धर्म, व्यवसाय किंवा कोणत्याही देशाच्या नावावरुन ठेवले जाऊ शकत नाही.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.