दौंड येथील पोलिस उपअधीक्षक हे तक्रार दाखल करून घेत नाही, म्हणून त्याविरोधात येथील महिला वकिलाने सोमवारी, २९ नोव्हेंबर रोजी थेट मंत्रालय गाठले. सकाळी मंत्रालयाच्या गेट समोर त्या महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र त्याआधीच त्या महिलेला पोलिसांनी रोखले आणि पोलिस ठाण्यात नेले.
महिलेला पोलिसांनी रोखले
आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या त्या वकील महिलेला मरीन ड्राईव्ह पोलिसांनी ताब्यात घेतले. आणि तिचे म्हणणे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. दौड येथील पोलिस उपअधीक्षक हे तक्रार दाखल करून घेत नाही, आपल्याला न्याय हवा आहे, असे सांगत न्याय मागण्यासाठी या महिला वकिलाने थेट मुंबईत मंत्रालय गाठले. त्यानंतर मंत्रालयाच्या प्रवेशद्वारासमोर आत्महत्येचा प्रयत्न केला, मात्र त्याच वेळी सतर्क राहून पोलिसांनी त्या महिलेला ताब्यात घेतले आणि मरिन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात घेऊन गेले. मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न करण्याच्या घटना मागील २ वर्षांपासून वारंवार घडत आहेत. याआधी काहींनी मंत्रालयात घुसून दुसऱ्या आणि तिसऱ्या माळ्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे मंत्रालयाच्या इमारतीच्या पहिल्या माळ्यावर गोलाकार जाळी बसवण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community