हिवाळी अधिवेशन ठरले! मुख्यमंत्री उपस्थितीत राहणार का?

100

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 22 डिसेंबर रोजी मुंबईत होणार आहे. 22 ते 28 डिसेंबर असा कार्यक्रम निश्चित झाला आहे. कालावधी वाढवायचा की नाही याबाबत 24 डिसेंबर रोजी बैठक होणार आहे, असे संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी दिली, या अधिवेशनात 12 विधेयके मांडली जाणार आहेत.

हे सरकार अधिवेशनापासून दूर पळत आहे. त्यांना चर्चा करायची नाही. सरकार कोरोनाचे कारण देत आहे. मात्र संसदीय अधिवेशन कोरोना काळातही चालले होते. तसेच सरकार ‘३१ डिसेंबर असल्यामुळे सगळे बाहेर जाणार’, असे सांगत आहे. मग सरकार तीन दिवसांचा खंड पाडून जानेवारीतही अधिवेशन घेऊ शकते. सरकार प्रश्नोत्तरे रद्द करत होते, आम्ही जबरदस्ती केली म्हणून कामकाजात प्रश्नोत्तरे घेतली.
– देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्ष नेते.

मुख्यमंत्री अधिवेशनाला उपस्थित राहणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तब्येतीमुळे डॉक्टरांनी प्रवास करू नये असे सुचवले आहे. मात्र विरोधी पक्षाने अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूरला घ्यावे, अशी विनंती केली आहे. उपमुख्यमंत्र्यांनी त्याला संमती दिली आहे. इतर बाबींचा विचार करून याबाबत निर्णय घेतला जाईल, असे परब म्हणाले. मुख्यमंत्री अधिवेशनाला प्रत्यक्ष उपस्थित राहणार असल्याची महत्त्वाची अपडेट अनिल परब यांनी दिली आहे. तसेच ज्यांचे दोन डोस झाले असतील त्यांनाच अधिवेशनात प्रवेश दिला जाईल. याशिवाय त्यांना आरटीपीसीआर टेस्टही करावी लागणार असल्याचे ते म्हणाले. मंत्री, राज्यमंत्री यांच्या सोबत केवळ एकाच अधिकाऱ्याला प्रवेश दिला जाणार असून विधानमंडळ सदस्यांचे स्वीय, सहायक, वाहनचालकांसाठी विधान भवनाच्या बाहेरील प्रांगणात स्वतंत्र व्यवस्था राहणार आहे. या काळात खासगी व्यक्तींना प्रवेश दिला जाणार नाही, असेही मंत्री परब म्हणाले.

(हेही वाचा निर्बंध लावण्याआधी विरोधकांना विश्वासात घ्या!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.