ओमिक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यात शाळा सुरू करण्याबाबत पालक व शालेय व्यवस्थापनामध्ये संभ्रम निर्माण झाला होता. परंतु शाळा ठरल्याप्रमाणे १ डिसेंबरलाच सुरू होणार, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून राज्यात प्राथमिक शाळांसाठी आरोग्य विभागाकडून नवी नियमावली जारी करण्यात आली आहे.
नवी नियमावली
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पूर्ण लसीकरण होणे आवश्यक आहे. शाळेत मास्क वापरणे बंधनकारक असून, शाळेत मैदानी खेळांना परवानगी नसेल. शाळा सकाळ व दुपार अशी दोन सत्रात घेणार येणार आहे, तसेच शाळांचा कालावधी हा केवळ ३ ते ४ तासांचा असणार आहे. विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्याचा अंतिम निर्णय हा पालकांचा असून, त्यांची परवानगी आवश्यक आहे, असेही नियमावलीत नमूद केले आहे. ज्या विद्यार्थ्यांना शाळेत येणे शक्य नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय उपलब्ध असावा. कर्मचाऱ्यांनी कोविड-19 साठीची 48 तासापूर्वीची आरटीपीसीआर चाचणी करावी. शाळांनी या सूचनांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केले आहे.
( हेही वाचा : जगाला चिंतेत टाकणा-या ओमिक्रॉन विषाणूचा फोटो पाहिलात का? )
शालेय बससाठी नियम
कोरोनानंतर प्रथमच शाळा सुरू होणार असल्यामुळे आनंददायी शिक्षणावर भर देण्यात येणार आहे. तसेच शालेय बस व्यवस्थापनातील प्रत्येक कर्मचाऱ्याला लसीकरण बंधनकारक असणार आहे. विद्यार्थ्यांनी प्रवासात मास्क व्यवस्थित लावावा याची खबरदारी देखील बस व्यवस्थापनाने घेणे आवश्यक आहे.
Join Our WhatsApp Community