तरुणीला घराबाहेर पडणे अशक्य! कारण ठरली गाडीची नंबर प्लेट

134

घरात गाडी असल्यावर प्रवास करणे अगदी सोयीचे होते. महाविद्यालयीन तरुणी-तरुणींना स्कुटी, बाईकचे खूप आकर्षण असते. पण या स्कुटीमुळेच दिल्लीतील एका तरुणीला घराबाहेर पडणं अशक्य झालं आहे. वडिलांनी तरुणीच्या वाढदिवशी स्कुटी भेट म्हणून दिली. परंतु या दुचाकीच्या नंबर प्लेट वरील तीन अक्षरे तरुणीचा डोकेदुखीचा भाग बनली आहेत.

कोणती आहेत ‘ती’ अक्षरे?

दिल्लीतील मध्यमवर्गीय कुटुबांने शोरूममधून दुचाकी खरेदी केली. परंतु त्याचा क्रमांक संबंधित कुटुंंबाला त्रासदायक ठरत आहे. या नंबर प्लेटवरील S.E.X. या तीन अक्षरांमुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. या अक्षरांमुळे संबंधित  तरुणीला बाहेर पडणेही कठीण झाले आहे. रस्त्यावर अनोळखी लोक या नंबर प्लेटकडे वळून पाहत अश्लील शेरेबाजी करतात, तसेच तरुणीच्या भावाला अनेक समस्यांचा सामना करावा लागून टाेमणे सहन करावे लागत आहेत.

( हेही वाचा : चिंता वाढली! आफ्रिकेतून मुंबईत ४६६ प्रवासी आले )

आरटीओ अधिकाऱ्यांशी चर्चा

तरुणी घाबरली असून, तिने घडलेल्या प्रकाराबद्दल घरी सांगितल्यावर वडिलांनी आरटीओ अधिकाऱ्यांना संपर्क केला आहे व हा क्रमांक बदलण्याची मागणी केली आहे. S.E.X. या अक्षरांच्या मालिकेतील १० हजार वाहनांना हा क्रमांक देण्यात आला असून, यात बदल करण्याची तरतूद ही प्रक्रिया सेट पॅटर्नवर चालते, असे मत वाहतूक तज्ज्ञांनी नोंदवले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.