भारतात आयपीएलचा मोठा चाहता वर्ग आहे. दरवर्षी मोठ्या आतुरतेने आयपीएलच्या हंगामाची वाट पाहिली जाते. २०२२ च्या आयपीएल मोसमाला अजून कालावधी असला, तरी यंंदाच्या आयपीएलमध्ये ८ ऐवजी १० संघ खेळवले जाणार आहेत. आयपीएल लिलावाआधी रिटेंशन प्रक्रिया पार पडते. यामध्ये कोणते खेळाडू संघाकडून कायमस्वरूपी खेळणार याची माहिती मिळते. या प्रक्रियेपूर्वीच केएल राहूल व राशिद खान या दोन खेळाडूंवर बंदी येण्याची शक्यता आहे.
का येणार बंदी?
लखनऊ आणि अहमदाबाद दोन नव्या संघांचा यंदा आयपीएलमध्ये समावेश होणार आहे. या दोन नव्या संघांशी केएल राहूल व राशिद खान यांनी याआधीच संपर्क साधल्याचा आरोप करत, पंजाब व हैदराबाद या संघांनी बीसीसीआयकडे तक्रार केली आहे. रिटेंशन प्रक्रियेपूर्वीच संपर्क साधल्यामुळे या दोन खेडाळूंविरूद्ध तक्रार करण्यात आली होती, अशी माहिती बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
( हेही वाचा : लवकरच मुंबई-नाशिक ‘मेमू’ लोकलने प्रवास करता येणार! )
रिटेंशनचे नियम
प्रत्येक संघ रिटेंशन प्रक्रियेमध्ये चार खेडाळूंना संघात पुन्हा समाविष्ट करू शकतात. यात चारपैकी केवळ दोनच परदेशी खेडाळूंचा समावेश असू शकतो. बीसीसीआयने यंदा प्रत्येक संघाला लिलिवात खेळाडू खरेदी करण्यासाठी 90 कोटी रुपये दिले आहेत. रिटेशनमध्ये खेळाडू खरेदी केल्यास यामधून रक्कम वजा केली जाईल.
Join Our WhatsApp Community