पराग अग्रवाल यांना ट्विटरचे नवे सीईओ बनवण्याची घोषणा होताच, त्यांच्या नावाची चर्चा प्रत्येक माध्यमात आणि सर्वत्र सुरु झाली, पराग मूळचे भारतीय आहेत, आयआयटी बॉम्बेमधून शिकलेले आहेत इत्यादी..पण ट्विटरवर त्याच्यांबद्दल वेगळीच चर्चा रंगली आहे. जॅक डोर्सी यांनी सोमवारी ट्विटरचे सीईओ पद सोडल्यानंतर पराग अग्रवाल यांच्या नावाची घोषणा होताच काही लोकांनी त्यांचे जुने ट्विट शोधून काढले.
ट्विटचा लावला जातोय वेगळा अर्थ
ट्रोलर्सनी त्यांचे दशकापूर्वीचे जुने ट्विट शोधून काढले ज्यामध्ये पराग अग्रवाल यांनी मुस्लिम,अतिरेकी,गोरे आणि वर्णद्वेषाबद्दल बोलले आहे. पराग अग्रवाल यांच्या ट्विटचा दशकभरानंतर वेगळा अर्थ लावला जात आहे, मात्र त्यांनी तेव्हाच या ट्विटबाबत स्पष्टीकरण दिले होते. या ट्वीटचा गैरफायदा घेत काही निधर्मीयांनी आता पराग यांना लक्ष्य केलं आहे.
"If they are not gonna make a distinction between muslims and extremists, then why should I distinguish between white people and racists."
— Parag Agrawal (@paraga) October 26, 2010
नेमकं काय होतं ते ट्विट
पराग अग्रवाल यांनी 26 ऑक्टोबर 2010 रोजी एक ट्विट केले. जर ते मुस्लिम आणि अतिरेकी यांच्यात फरक करणार नाहीत तर मी गोरे लोक आणि वर्णद्वेषी यांच्यात फरक का करू? अशा आशयाचं ते ट्वीट होतं. त्यावर स्पष्टीकरण देताना पगार अग्रवाल यांनी स्पष्ट केले होते की, जे मी ट्वीट केले आहे ते कॉमेडियन असिफ मांडवी यांनी ‘डेली शो’ दरम्यान सांगितले होते. तेच मी ट्वीट केले. खरं तर, या कार्यक्रमात अनेक विनोदी कलाकार सहभागी झाले होते आणि ते कृष्णवर्णीय लोकांच्या हक्कांबद्दल बोलत होते. असं पराग यांनी आपल्या ट्वीट संदर्भात स्पष्टीकरण देताना म्हटलं होतं.
(हेही वाचा :रुग्ण दगावल्यास आता डॉक्टरांना जाब विचारता येणार नाही! )
Join Our WhatsApp Community