पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तीन दिवसीय मुंबई दौऱ्याचा 1 डिसेंबर हा दुसरा दिवस आहे. त्यांच्यासोबत त्यांचा पुतण्या आणि तृणमूल काँग्रेस पक्षाचे खासदार अभिषेक बॅनर्जीही आहेत. महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आणि युवासेना नेते आदित्य ठाकरे यांची 30 नोव्हेंबरला भेट घेतल्यानंतर त्या 1 डिसेंबरला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत. मात्र, काँग्रेसशिवाय विरोधी पक्षांची एकजूट करण्याचा प्रयत्न करणा-या ममता बॅनर्जींना काँग्रेसशिवाय विरोधी एकजूट शक्य नसल्याचे मलिक यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादीने दिला दणका
राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी 30 नोव्हेंबर रोजी सांगितले की, पवार नेहमीच विरोधी पक्षांना एकत्र येण्यावर भर देत असतात. पण काँग्रेसशिवाय हे शक्य नाही. मलिक म्हणाले की, महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येऊ शकतात, तर टीएमसीही काँग्रेसला सहकार्य करू शकते.
पक्षाचे वर्तुळ वाढविण्याचा प्रयत्न
ममता बॅनर्जी त्यांच्या टीएमसी पक्षाची व्याप्ती राष्ट्रीय स्तरावर वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. या दिशेने पाऊल टाकत त्या गेल्या काही दिवसांपासून देशातील विविध राज्यांचा दौरा करत आहे. यादरम्यान त्या राजकारण्यांना भेटून त्यांचे मन जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
सिद्धिविनायक मंदिराला दिली भेट
पहिल्या दिवसाच्या दौऱ्यात त्यांनी मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराला भेट दिली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उत्तम आरोग्यासाठी त्यांनी गणेशाची प्रार्थना केल्याचे सांगण्यात येत आहे. यासोबतच २६/११ च्या मुंबई हल्ल्यात शहीद झालेले पोलीस हवालदार तुकाराम ओंबळे यांनाही ममता बॅनर्जी यांनी श्रद्धांजली वाहिली.
शरद पवारांची घेणार भेट
टीएमसी प्रमुख 30 नोव्हेंबर रोजी शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांची भेट घेतली होती. त्यांचा हा दौरा खास उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी असला तरी प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांनी त्यांची भेट घेतली. 1 डिसेंबरला त्या पवार आणि उद्धव ठाकरे यांचीही भेट घेणार आहेत, अशीही चर्चा आहे.
(हेही वाचा: रुग्ण दगावल्यास आता डॉक्टरांना जाब विचारता येणार नाही! )
Join Our WhatsApp Community