वर्षाच्या शेवटच्या महिन्यात म्हणजेच डिसेंबर महिन्यात तुम्हाला बँकांचे कामं लवकर उरकायची असतील तर त्या आधी बँकांच्या सुट्ट्यांची संपूर्ण यादी तपासून घ्या… कारण डिसेंबर महिन्यात तब्बल 12 दिवस बँकांचे कामकाज बंद राहणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2021 साठी जारी केलेल्या सुट्ट्यांच्या यादीनुसार डिसेंबरमध्ये सर्व सार्वजनिक आणि खासगी बँका 12 दिवसांपर्यंत बंद राहणार आहेत.
मिळालेल्या बातम्यांनुसार, बँकेच्या सुट्ट्या राज्यानुसार आणि काही खासगी बँकांमध्ये वेगवेगळ्या असतात. याशिवाय बँकांच्या या सुट्ट्या तीन टप्प्यांत विभागलेल्या आहेत. निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स अॅक्ट अंतर्गत हॉलिडे, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ऍक्ट अंतर्गत हॉलिडे आणि रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट हॉलिडे आणि बँकांचे क्लोजिंग अकाऊंटला अशा सुट्ट्या विभागल्या गेल्या आहेत. जाणून घ्या देशासह राज्यातील सुट्ट्यांची यादी…
(हेही वाचा – लसवंत असाल तरच आता रिक्षा-टॅक्सीत मिळणार एन्ट्री!)
• 3 डिसेंबर – सेंट फ्रान्सिस झेव्हियर्सच्या जयंती, गोव्यातील बँका बंद राहतील.
• 18 डिसेंबर – यू सोसोय थाम यांची पुण्यतिथी, शिलाँगमध्ये बँकांचा कामकाज बंद राहील
• 24 डिसेंबर – ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला आयझॉल आणि शिलाँगमध्ये बँका राहतील.
• 27 डिसेंबर – आयझॉलमध्ये बँका बंद राहतील
• 30 डिसेंबर – शिलाँग आणि आयझॉलमध्ये बँकांचे कामकाज
• 31 डिसेंबर – नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला आयझॉलमध्ये बँका बंद राहणार आहे.
राज्यात हे 6 दिवस बँका राहणार बंद
• 5 डिसेंबर – रविवार
• 11 डिसेंबर – दुसरा शनिवार
• 12 डिसेंबर – रविवार
• 19 डिसेंबर – रविवार
• 25 डिसेंबर – चौथा शनिवार आणि ख्रिसमस
• 26 डिसेंबर – रविवार