पाॅक्सो अॅक्टवर आता कोलकता उच्च न्यायालयानेही एक महत्त्वाचा निर्णय दिला. मुलीचा स्कार्फ खेचणे, तिचा हात पकडणे आणि मुलीला लग्नासाठी विचारणे या गोष्टी ‘लैंगिक अत्याचार’ किंवा ‘लैंगिक छळ’ नसल्याने ते पोक्सो अॅक्टच्या अंतर्गत येत नाही, असे कोलकता उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
कनिष्ट न्यायालय (ट्रायल कोर्ट) ही न्याय प्रशासनाची मूलभूत रचना आहे, ज्यावर वरिष्ठ न्याय मंच उभे आहे. एखाद्या निष्पाप व्यक्तीवर अन्याय ठरू शकतो, म्हणून कदाचित लग्नाविषयी विचारणा करणा-या त्या मुलाचा उद्देश प्रामाणिक असू शकतो, असे न्यायमूर्ती बिबेक चौधरी यांच्या खंडपीठाने म्हटले.
काय आहे प्रकरण?
तक्रारदारानुसार, पीडित मुलगी शाळेतून घरी परतत असताना, तिला आरोपीने स्कार्फला ओढून नेले आणि लग्नासाठी विचारले. लग्न करण्यास नकार दिलास तर, तुझ्या अंगावर अॅसिड हल्ला करेन अशी धमकी त्या पीडितेला देण्यात आली.
कनिष्ठ न्यायालयाने यावर सुनावणी करताना, म्हटले की मुलीची ओढणी खेचणे आणि मुलीला लग्नासाठी विचारणे हा लैंगिक अत्याचार आहे आणि कनिष्ठ कोर्टाने त्यासाठी आरोपीला पोक्सो अॅक्ट सेक्शन 354, 354B, 506 आणि 509 अंतर्गत त्याला दोषी ठरवले.
उच्च न्यायालयाने नोंदवले ‘हे’ मत
अपीलकर्त्याने ‘ओढणी’ ओढण्याचे आणि पीडितेचा हात ओढण्याचे आणि तिला लग्नाचा प्रस्ताव देण्याचे कथित कृत्य केले आहे, असे गृहीत धरूनही असे कृत्य लैंगिक अत्याचार किंवा लैंगिक छळाच्या व्याख्येत येत नाही. या कृत्यासाठी आरोपी, भारतीय दंड संहितेच्या कलम 506 सह कलम 354 ए अंतर्गत गुन्ह्यासाठी जबाबदार असू शकतो, असे मत उच्च न्यायालयाने नोंदवले आहे.
( हेही वाचा: सत्तेच्या लालसेपोटी शिवसेना बनली सावरकर विरोधी! चित्रा वाघ यांचे टीकास्त्र )
Join Our WhatsApp Community