मुंबईत मागील काही दिवसांपासून कोविड-19 आजाराच्या रुग्णांमधील वाढ नियंत्रणात येत असतानाच आता ओमीक्रॉनच्या नव्या विषाणूच्या चर्चेने पुन्हा एकदा मुंबईकरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यातच बुधवारी मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या रुग्णवाहिकेच्या आकड्याएवढी आढळून आली. त्यामुळे मुंबईकरांसमोरील कोरोनाचे संकट अजूनही कमी झालेले नाही.
मुंबईत १९०४ रुग्ण सक्रीय
मुंबईत बुधवारी दिवसभरात ३७ हजार ८७७ कोविड चाचण्या करण्यात आल्या, त्यामध्ये ‘१०८’ नवीन रुग्ण आढळून आले आहे. जो रुग्णवाहिकेचा क्रमांक आहे, हा योगायोग आहे. यामध्ये २१५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे संपूर्ण मुंबईत सध्या १९०४ रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरु आहेत.
(हेही वाचा उच्च शिक्षित तरीही १ हजार कामगारांच्या हाती झाडूच!)
बरे झालेल्या रुग्णांचा दर ९७ टक्के
तर दिवसभरात चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या मृत्यू पावलेल्या रुग्णांपैकी दोन रुग्ण हे दीर्घकालिन आजारी होते, तर त्यातील दोन पुरुष आणि दोन महिलांचा समावेश होता. यातील एका रुग्णाचे वय हे ४० वर्षांखालील होते, एका रुग्णाचे वय हे साठी पार होते आणि दोन रुग्णांचे वय ४० ते ६० वयोगटातील होते. त्यामुळे आतापर्यंत एकूण मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या १६ हजार ३४० एवढी झाली आहे. मुंबईतील बरे झालेल्या रुग्णांचा दर हा ९७ टक्के एवढा आहे. मागील आठवड्यातील कोविड वाढीचा दर हा ०.०२ टक्के एवढा आहे, तर रुग्ण दुप्पटीचा दर हा २,७८० एवढा आहे. मुंबईत सक्रिय कंटेन्मेंट असलेल्या झोपडपट्टयांची संख्या शून्यावरच असून इमारतींची संख्या १६ एवढी झाली आहे.
Join Our WhatsApp Community