नुकतीच फाॅर्चून इंडियाने भारतातील 50 शक्तीशाली महिलांची यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार, भारतातील सर्वात प्रभावशाली महिलांमध्ये देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारमण या अग्रस्थानी आहेत. त्यानंतर रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक नीता अंबानी आणि तिस-या स्थानी अभिनेत्री प्रियांका चोप्रा आहे. या यादीत ईशा अंबानीचेही नाव आहे. रिलायन्स जिओ आणि रिलायन्स रिटेलची डायरेक्टर ईशा ही सर्वात तरुण प्रभावशाली महिला आहे. तिचे वय फक्त 30 वर्ष आहे.
त्या पहिल्या केंद्रीय मंत्री
अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी मार्च 2020 मध्ये टाळेबंदी लागू झाल्यानंतर 36 तासांनी पत्रकार परिषद घेतली होती. अशी पत्रकार परिषद घेणा-या त्या पहिल्या केंद्रीय मंत्री आहेत. तसेच त्यावेळी संपूर्ण देशाला कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी आणि अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी सरकारच्या योजनांबद्दल जाणून घ्यायचे होते. त्या भयंकर काळात त्यांनी अर्थमंत्री म्हणून आपली जबाबदारी चोख पार पाडली, असे फॅार्चून इंडियाने निर्मला सितारमण यांच्याबद्दल सांगितले आहे.
नीता अंबानी दुस-या शक्तीशाली महिला
एप्रिल 2020 मध्ये टाळेबंदी झाल्यानंतर रिलायन्स फाऊंडेशन हॅास्पिटलच्या व्यवस्थापन संघासोबत एक बैठक घेऊन या कोरोनामुळे गरिबांना किती फटका बसू शकतो हे नीता अंबानी यांनी जाणून घेतले. त्यानंतर मुंबईत बीएमसी सोबत हातमिळवणी करत, 50 खाटांचे कोविड रुग्णालय बांधण्याची जबाबदारी स्वीकारली. नंतर त्याची क्षमता वाढवून 2 हजार खाटा एवढी केली. ऑक्सिजनचा पुरवठा वाढवण्यात मदत केली आणि उपचारही मोफत करण्यात आले. असे नीता अंबानी यांच्याबद्दल फाॅर्चून इंडियाने सांगितले आहे.
(हेही वाचा: ओमिक्रॉनचं 23 देशात थैमान! संसर्ग फैलण्याची शक्यता, WHO ची माहिती )
Join Our WhatsApp Community