अंजू बॉबी जॉर्ज हिला जागतिक अॅथलेटिक्समधून सर्वोत्कृष्ट महिला पुरस्कार

252

भारताची दिग्गज ऍथलीट अंजू बोकी जॉर्ज हिला जागतिक ऍथलेटिक्सने प्रतिभा विकसित करण्यावर आणि देशात लैंगिक समानतेचे समर्थन करण्यासाठी केलेल्या कार्यासाठी वुमन ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित केले आहे. जागतिक चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकणारी एकमेव भारतीय अंजू (पॅरिस 2003) हिची बुधवारी रात्री वार्षिक पुरस्कारादरम्यान या सन्मानासाठी निवड करण्यात आली. याशिवाय, ती IAAF वर्ल्ड अॅथलेटिक्स फायनल्स (मोनॅको 2005) ची सुवर्णपदक विजेती आहे.

स्त्री-पुरुष समानतेचा पुरस्कार केला

भारताची अंजू बॉबी जॉर्ज, माजी आंतरराष्ट्रीय लांब उडी खेळाडू, ही अजूनही या खेळाशी संबंधित आहे. तिने 2016 मध्ये तरुण मुलींसाठी प्रशिक्षण अकादमी उघडली, असं जागतिक ऍथलेटिक्सने एका प्रकाशनात म्हटले आहे. भारतीय अॅथलेटिक्स फेडरेशनच्या वरिष्ठ उपाध्यक्षा या नात्याने तिने स्त्री-पुरुष समानतेचा सतत पुरस्कार केला, तसेच ती शालेय मुलींना खेळातील त्यांच्या भावी नेतृत्वासाठी मार्गदर्शन करत आहे. असे या प्रकाशनात म्हटले आहे.

अंजूचे करिअर नव्या उंचीवर

अंजू म्हणाली की, हा सन्मान मिळाल्याचा मला अभिमान वाटतो. तिने ट्विट केले की, सकाळी उठून खेळासाठी काहीतरी करण्यापलिकडे दुसर चांगलं काहीही नाही. माझ्या प्रयत्नांचे कौतुक केल्याबद्दल धन्यवाद, असं ट्विट करुन अंजू यांनी आभार मानले आहेत.

पती रॉबर्ट बॉबी जॉर्जकडून कोचिंग घेतल्यानंतर अंजूचे करिअर नवीन उंचीवर पोहोचले. 2004 च्या ऑलिम्पिकमध्ये तिने सहावे स्थान पटकावले होते.

 (हेही वाचा : ममता बॅनर्जींकडून राष्ट्रगीताचा अपमान; भाजप नेत्याची पोलिसात तक्रार )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.