सातारा जिल्ह्यातील जुन्नर आंबेगाव तालुक्यात कालपासून संततधार पाऊस आणि थंडीची हुडहुडी सर्वाधिक वाढली आहे. अशात आंबेगाव जुन्नर तालुक्यातील विविध गावांमध्ये ३७८ पेक्षा अधिक पाळीव शेळ्या, मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. थंडीचा सर्वाधिक फटका पाळीव जनावरांना बसलेला पहायला मिळतो आहे.
आंबेगाव तालुक्यातील नऊ गावांमध्ये १८८, तर जुन्नर तालुक्यातील पाच गावांमध्ये ७०, खेडमध्ये ४५, शिरुरमध्ये ७५ पेक्षा अधिक शेळ्या-मेंढ्यांचा मृत्यू झाल्याने शेतक-यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ज्या मेंढ्याकडून थंडीपासून बचाव करण्यासाठी लोकर मिळते. त्याच मेढ्यांच्या मृत्यूमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेंचे वातावरण निर्माण झाले आहे.
पशुवैद्यकीय विभागाकडून पंचनामे
पावसाची संततधार आणि थंडीची हुडहुडी यामुळे शेळ्या-मेंढ्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला असून जिल्हा परिषदेच्या पशुवैद्यकीय विभागाकडून तातडीने पंचनामे करण्याचे काम सुरु आहे. मोठ्या प्रमाणावर शेळ्या-मेंढ्यांच्या मृत्यूमुळे परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
( हेही वाचा : मालमत्तेसाठी वृद्ध मातापित्याच्या छळवणूकीत वाढ – उच्च न्यायलय )
शेतकऱ्यांचे नुकसान
तालुका आंबेगाव येथील धोंडमाळ शिवारमध्ये पाऊस व गारव्यामुळे ३० ते ३५ मेंढरू मृत्युमुखी पडले आहेत. शिंगवे येथे २० ते २५ आणि खडकी येथे ४० ते ४५ मेंढ्या रात्री पडलेल्या पावसामुळे मृत्युमुखी पडल्या आहेत. पिंपळगाव म्हाळुंगे येथील ३ मेंढ्या, तर पारनेर तालुक्यात २५ शेळ्या थंडीने गारठून दगावल्या आहेत. पाळीव शेळ्या-मेंढ्यांच्या मृत्यूमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
Join Our WhatsApp Community