महापौर म्हणतात, ‘सर्वांनाच चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करता येणार’

ठाकरे सरकारच्या या परिपत्रकाला शिवसेनेच्या महापौरांकडून केराची टोपली?

194

ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर संसर्गाचा धोका लक्षात घेता राज्य सरकारने खबरदारी म्हणून ६ डिसेंबर रोजी डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच्या ६५व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर, चैत्यभूमी याठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाबाबत मार्गदर्शक सूचनांचे परिपत्रक जारी केले आहे. मात्र ठाकरे सरकारच्या या परिपत्रकाला शिवसेनेच्या महापौरांनी केराची टोपली दाखली आहे. यावेळी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी असे म्हटले की, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महिपरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर सर्वांना येता येणार असून अभिवादन करता येणार आहे.

काय म्हणाल्या महापौर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महिपरिनिर्वाण दिनानिमित्त सर्वांनाच चैत्यभूमीवर अभिवादन करता येणार आहे. मात्र, या दरम्यान कोविड प्रोटोकॉलचे पालन व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. यासह कोरोना महामारीच्या आजाराचा धोका लक्षात मुंबई आणि जवळपासच्या नागरिकांनी ऑनलाइन पद्धतीने दर्शन घेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे असे आवाहनही महापौरांनी केले. मुंबई आणि जवळपास नागरिकांना चैत्यभूमीवर कधीही येता येईल. मात्र, बाहेरगावावरून येणाऱ्या नागरिकांना अभिवादन करण्यासाठी प्राधान्य द्यावे असे महापौरांनी म्हटले.

मार्गदर्शक सूचना

  • ६ डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम कोविड-१९ विषयक आरोग्याच्या दृष्टीकोनातून संपूर्ण खबरदारी घेत साध्या पद्धतीने, जास्त लोकांनी एकत्रित न येता आयोजित करावा.
  • हा दिवस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. वाढता संसर्ग लक्षात घेता सर्व अनुयायांनी काळजी घेणे व गांभीर्याने वागणे आवश्यक आहे. तसेच दादर, चैत्यभूमी येथील कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दूरदर्शनवरून करण्यात येणार असल्याने सर्व अनुयायांनी घरी राहूनच, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करावे.
  • शासकीय मानवंदना देण्यासाठी मान्यवर उपस्थित राहतील. जे चैत्यभूमी येथे अभिवादन करण्यासाठी येतील त्यांचे कोविड लसींचे दोन्ही डोस पूर्ण झालेले असणे आवश्यक आहे. शरीराचे तापमान सर्वसाधारण आहे अशा, लोकांना कार्यक्रमाला प्रवेश देण्यात येईल. सोशल डिस्टन्सींगचे सर्व नियम पाळणे बंधनकारक असेल.
  • सदर परिसरात कोणतेही स्टॉल लावू नयेत. तसेच सभा, मोर्चे काढू नयेत. राज्यातील प्रत्येक तालुक्यात हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत असल्यामुळे कोविड विषयक नियम पाळून आदेश काढावेत.
  • स्थानिक प्रशासन, पोलिस, महापालिका यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.