कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरियंटमुळे राज्यातील शाळा सुरू करण्याबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे शहरी भागातील शाळा १५ डिसेंबर रोजी सुरू करण्यात येतील, असा निर्णय शासनाकडून घेण्यात आला. परंतु ओमिक्रॉन या नव्या व्हेरियंटचा विचार करता, शाळा सुरू करण्याबाबत पुनर्विचार करणार असल्याचे संकेत अजित पवार यांनी दिले आहेत.
संंपूर्ण महाराष्ट्रात एक निर्णय
सध्या महाराष्ट्रात ग्रामीण भागातील शाळा सुरू आहेत. परंतु ओमिक्रॉनमुळे शहरी भागातील शाळा १५ डिसेंबरला चालू होणार की नाही, याबाबत पुन्हा संभ्रम निर्माण झाला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात बैठक होऊनच, शहरी भागातील शाळा सुरू करण्याबाबत अंतिम निर्णय घेणार असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले. तसेच ग्रामीण व शहरी भागात एकच निर्णय घेण्यात येणार असून, संपूर्ण महाराष्ट्रात एक धोरण ठरवण्यात येईल, असेही त्यांनी सूचित केले.
( हेही वाचा : लसवंत आहात तरच पगार! आदेश येताच कर्मचाऱ्यांची उडाली धांदल )
परराज्यातून येणाऱ्यांसाठी नियम
परदेशातून येणाऱ्यांसाठी सरकारने विशेष नियमावली जारी केली होती. त्याचप्रमाणे परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्यांसाठी आरटीपीसीआर चाचणी सक्तीची करण्यात आली आहे. तसेच देशातील व राज्यातील नियम एकसारखे असावेत, अशा दृष्टीने केंद्र सरकारशी चर्चा करणार करून निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती अजित पवारांनी दिली आहे.
Join Our WhatsApp Community