आता ममतांच्या विरोधात भातखळकरांची तक्रार

154

राष्ट्रगीताचा अवमान केल्याप्रकरणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे. त्यांच्या विरोधात ठिकठिकाणी तक्रार दाखल होऊ लागली आहे. आता भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी ममता बॅनर्जी यांच्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

(हेही वाचा ममता बॅनर्जींकडून राष्ट्रगीताचा अपमान; भाजप नेत्याची पोलिसात तक्रार)

बॅनर्जी यांना शिक्षा करण्याची मागणी

ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रगीताच्या केलेल्या अवमानाविरोधात दिंडोशी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ममता बॅनर्जी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा आणि त्यांना शिक्षा व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. काल प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी फोर सिझन हॉटेलमध्ये बैठक घेतली. ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रगीताला स्वतःच सुरुवात केली. प्रथम त्या बसूनच गात होत्या. नंतर त्यांना भान आले असावे म्हणून त्या उभ्या राहिल्या आणि त्यानंतर त्यांनी राष्ट्रगीत अर्धवटच संपविले. १९७१चा जो राष्ट्रगीताचा सन्मान कायदा आहे, त्या आधारे हे स्पष्ट होते की, त्यांनी राष्ट्रगीताचा अवमान केला आहे. १९७१ च्या या कायद्यातील कलम ३ नुसार हा राष्ट्रगीताचा अपमान आणि देशाचा अपमान आहे. त्यामुळे दिंडोशी पोलिस ठाण्यात मी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्यावरोधात गुन्हा दाखल करून त्यांना शिक्षा करावी, अशी मी मागणी केली आहे, असे भातखळकर म्हणाले. बुधवार, १ डिसेंबर रोजी ममता बॅनर्जी त्यांनी आपल्या मुंबई दौऱ्या दरम्यान एका विशेष कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमात ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर, अभिनेत्री स्वरा भास्कर, अभिनेत्री रिचा चढ्ढा, पत्रकार राजू परुळेकर, लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर, स्टँड अप कॉमेडियन मुनव्वर फारुकी अशी अनेक मंडळी उपस्थित होती. मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये हा कार्यक्रम पार पडला.

(हेही वाचा पवार-ममतांच्या भेटीवर अशोक चव्हाणांचे ट्विट आले चर्चेत)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.