मागील महिनाभरापासून जगभरात थैमान घालत असलेल्या ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या अतिघातक विषाणूचा अखेर भारतात प्रवेश झाला आहे. त्यामुळे आता भारताची चिंता आणखी वाढली आहे. त्यामुळे महाराष्ट्राची चिंता वाढली आहे. आरोग्य खात्याने याची अधि टकात ओमायक्रॉनचा प्रवेश, भारताची चिंता वाढली आहे.
रुग्णांना सौम्य लक्षणे दिसून
कर्नाटकात 11 आणि 20 नोव्हेंबरला परदेशातून दोन जण भारतात आले होते. त्यांचा कोरोना चाचणी अहवाल सकारात्मक आला होता. आता ओमिक्रॉनचा अहवालही सकारात्मक आला आहे. त्यातलाच एक रुग्ण हा 64 वर्षाचा आहे, तर दुसरा रुग्ण हा 44 वर्षांचा आहे. या दोन्ही रुग्णांना सौम्य लक्षणे दिसून आली होती. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज नव्हती. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
(हेही वाचा ओमिक्रॉनचं 23 देशात थैमान! संसर्ग फैलण्याची शक्यता, WHO ची माहिती)
जगातील 29 देशांत ओमिक्रॉनचा फैलाव
गेल्या एक महिन्यापासून कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. महाराष्ट्र आणि केरळमध्येच 10 हजारांपेक्षा अधिक रुग्ण आहेत. देशातील इतर रुग्णांच्या संख्येने हा आकडा 55 टक्के इतका आहे. 49 टक्के लोकांना कोरोनाचे डोस दिल्यानंतर कोरोना रुग्णांच्या संख्या कमी झाल्याचे दिसून आल्याचे केंद्राचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी सांगितले. तसेच जगातील 29 देशात ओमिक्रॉनचा फैलाव झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
Join Our WhatsApp Community