विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी मुंबई महापालिकेने क्लीन अप मार्शल यांना कारवाई करण्याचे अधिकार दिले आहेत, मात्र ते नागरिकांवर दादागिरी करून त्यांच्याकडून लूटमार करत आहेत. त्यामुळे आता महापालिकेने यावर नामी शक्कल लढवली आहे. क्लीन अप मार्शलला देण्यात आलेल्या ड्रेसवरच तो क्लीन अप मार्शल हा कोणत्या वॉर्डाचा आणि कोणत्या कार्यालयाचा आहे, याचा उल्लेख आहे. त्यामुळे त्या क्लीन अप मार्शलविरोधात तक्रार करणे सहज शक्य होणार आहे, असे महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
(हेही वाचा वीर सावरकर हे पर्मनंट भारतरत्नच! फडणवीसांनी खडसावले सेनेला)
Join Our WhatsApp Community