मोबाईलवर बोलणं आता पडणार महागात! वाचा, नवा केंद्रीय मोटार वाहन कायदा

143

तुम्हाला वेगवान गाडी चालवण्याची सवय आहे का? तुम्ही गाडी चालवताना मोबाईलवर बोलता का? असं जर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. कारण आता वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या बेशिस्त वाहन चालकांना जरब बसण्यासाठी नवीन केंद्रीय मोटार वाहन कायद्याची अंमलबजावणी महाराष्ट्रात होणार आहे. या नव्या कायद्यात, भरमसाठ दंडाची तरतुद करण्यात आली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातही नवीन केंद्रीय मोटार वाहन कायद्याची अंमलबजावणीचा निर्णय परिवहन विभागाकडून घेण्यात आला आहे.

असा असणार नवा कायदा

जर तुम्ही वाहन चालविताना मोबाईलवर बोलत असाल तर तुम्हाला एक हजार रुपये दंड, तर चार चाकी वाहन मालकांना दोन हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. तीन वर्षांच्या आत दुसऱ्यांदा किंवा त्यानंतर असाच गुन्हा घडल्यास प्रत्येक गुन्ह्यासाठी दहा हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. इतकेच नाही तर विना लायसन्स तुम्ही वाहन चालवत असाल तर चालकाकडून पाच हजाराचा दंड आकारण्यात येणार आहे.

(हेही वाचा – धक्कादायक! महाराष्ट्राच्या सीमेवर धडकला ओमिक्रॉन)

दंडाच्या रकमेत मोठी वाढ

केंद्र सरकारने मोटर वाहन कायद्यात बदल करण्यात आला असून त्यातील दंडाच्या रकमेत मोठी वाढ केली आहे. मात्र महाराष्ट्रात केंद्र सरकारने मोटर वाहन कायद्याला विरोध करण्यात आला होता. परंतु राज्यातील वाहतुक नियमांचे होणारे उल्लंघन आणि वाढणारे अपघात लक्षात घेता परिवहन विभाग नवीन कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्नशील होता. त्यानुसार परिवहन विभागाने १ डिसेंबर २०२१ ला अधिसूचना जाहीर केली आहे. बेदरकारपणे आणि धोकादायकरित्या वाहन चालविल्यास चालकाला एक हजार रुपये, तर चार चाकी चालकाला तीन हजार रुपये आणि इतर वाहनांच्या चालकाला चार हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. वाहनांना रिफ्लेक्टर नसणे, फॅन्सी नंबर प्लेट बसविणे या वाहतूक नियमांविरोधात यापूर्वी २०० रुपये असलेल्या दंडाच्या रकमेत वाढ करुन ती एक हजार रुपये करण्यात आल्याचे या अधिसूचनेत म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.