दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरियंट ओमिक्रॉनने संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे. असातच ऑमिक्रॉनची दहशत असताना भारतात कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमियक्रॉनने शिरकाव केला आहे. या व्हेरियंटचा फैलाव रोखण्यासाठी कोरोना लसीकरणात काही बदल करण्याची गरज आहे का? कोरोना लसीचा बुस्टर डोस किंवा तिसऱ्या डोसची गरज आहे का? असे प्रश्न सध्या उपस्थितीत होत आहे. यावरच नीति आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी महत्त्वाचे विधान केले आहे.
बुस्टर डोस आवश्यक?
ऑमिक्रॉन संसर्गाच्या पार्श्वभूमीवर व्ही. के. पॉल यांनी असे सांगितले की,ओमिक्रॉनची वैशिष्ट्ये, त्याचा प्रभाव, त्यामुळे होणारे परिणाम या सर्वांनाचा अभ्यास करून तो समजून घेतलं जात आहे. देशासह संपूर्ण जगात या व्हेरियंटमुळे लसीकरण किंवा उपचारांवर अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. या व्हेरियंटबद्दल आणखी काही माहिती समोर आल्यावर त्यावर निर्णय घेणे योग्य ठरेल, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे अद्याप बुस्टर डोस घेणं तितकसं आवश्यक नसणार असल्याचे दिसतेय.
(हेही वाचा – पोलिसांच्या रखडलेल्या पदोन्नती मिळाला अखेर मुहूर्त, 175 अधिकाऱ्यांची बढती)
लहान मुलांचे लसीकरण किती योग्य?
दरम्यान, अद्याप लहान मुलांचे कोरोना लसीकरण सुरु झालेले नाही, त्यामुळे या व्हायरसपासून बचाव करण्यासाठी लहान मुलांचं लसीकरण तात्काळ सुरु करण्याची गरज आहे का?, या प्रश्नावर बोलताना व्ही. के. पॉल म्हणाले, या व्हेरियंटबद्दल अद्याप कोणताही निर्णय वैज्ञानिक निकशांच्या आधारावर घेण्यात आलेला नाही. संपूर्ण माहिती घेतल्यानंतर यावर निर्णय होईल, त्यामुळे घाईने लहान मुलांचे लसीकरण करण्यात येऊ नये. यामुळे रणनीती कोणत्या दिशेने जाते, बूस्टर डोससाठी त्याचा परिणाम काय आहे, त्याच्या वैज्ञानिक पैलूंच्या दृष्टीने बारकाईने अभ्यास करून, त्यावर बारीक लक्ष ठेवून काम सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.