ओमिक्राॅन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सध्या जग भयभीत झाले आहे. या ओमिक्राॅनचा विषाणू अनेक देशांमध्ये सापडला आहे. भारतातही गुरुवारी या विषाणूचे दोन रुग्ण आढळून आले. पण त्यातील एक रुग्ण भारतीय यंत्रणांना चकवा देऊन पळालयाची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या दोन रुग्णांपैकी एक रुग्ण 66 वर्षीय असून दक्षिण आफ्रिकेतून आल्यानंतर ते पॉझिटिव्ह आढळले होते. त्यांच्यात कोणतीही लक्षणे नव्हती. त्यांना विलगीकरणात राहण्यास सांगण्यात आले होते. ते जिनोम सिक्वेंसिंगचा अहवाल येण्याआधीच खासगी प्रयोगशाळेकडून निगेटिव्ह कोरोना अहवाल घेऊन आठवडाभरापूर्वी दुबईला गेले.
महाराष्ट्र सरकार सावध
ओमिक्राॅनचे रुग्ण आढळल्याचं कळताच केंद्रानं परदेशातून येणाऱ्यांसाठी नियम अधिक कडक केले, भारतात आल्यानंतरही आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करुन सक्तीचं विलगीकरणाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्राच्या शेजारच्या राज्यात रुग्ण सापडल्यानं आता महाराष्ट्र सरकारही सावध झालं आहे.
(हेही वाचा : प्रदूषणाचा विळखा! कोल्हापूरात पंचगंगेच्या पाण्याला फेस )
महाराष्ट्र सरकारच्या गाईडलाईन्स
- 12 ऐवजी केवळ 3 देशांचा हाय रिस्क कंट्रीजमध्ये समावेश
- साऊथ आफ्रिका, बोस्टवाना, झिम्बाम्बे हाय रिस्क कंट्रीज
- हाय रिस्क कंट्री मधून आलेल्या प्रवाशांना आरटीपीसीआर टेस्ट करणे बंधनकारक
- 7 दिवस संस्थात्मक क्वारंटाईन बंधनकारक
- इतर राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्यांसाठी लशीच्या दोन डोसचं प्रमाणपत्र बंधनकारक
- किंवा 72 तासांपूर्वीचा आरटीपीसीआर टेस्ट निगेटिव्ह रिपोर्ट सक्तीचा