गेल्या 25 दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच असून अद्याप कर्मचारी एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण व्हावे, या मागणीवर ठाम आहेत. तर एसटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप मिटवण्यासाठी परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात 41 टक्क्यांची वाढ होणार असल्याची घोषणा केली. या घोषणेनंतर देखील कर्मचाऱ्यांना संप मागे न घेता कामावर रूजू होण्यास नकार दिला. त्यामुळे महामंडळाकडून कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. यानंतर सरकारच्या आश्वासनावर विश्वास ठेवत बहुसंख्य कर्मचारी कामावर रूजू झाले. मात्र, भविष्यात या संपात सहभागी होणार नाही, जो संप झाला तो बेकायदेशीर होता, अशा आशयाच्या हमीपत्रावर कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षरी घेतली जात आहेत.
‘वचनपत्रा’तील मजकूर अडचणीत आणणारा
गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारले आहे. त्यामुळे एकही लालपरी कोणत्याही आगारातून बाहेर पडली नाही. त्यामुळे एसटीने प्रवास करणाऱ्या एसटीच्या प्रवाशांचे मोठे नुकसान झाले. मात्र अद्याप मोठा कर्मचारी वर्ग अजूनही संपावर असून सेवेत रूजू झालेले नाही. तर दूसरीकडे अनेक कर्मचाऱ्यांनी संपातून माघात घेत सेवेत रुजू होण्याचा निर्णय घेतला. आता अशा कर्मचाऱ्यांकडून काही विभागांमध्ये ‘वचनपत्र’ भरून घेतले जात आहे. सध्या हे हमीपत्र व्हायरल होत असून व्हायरल होणाऱ्या ‘वचनपत्रा’तील मजकूरही कर्मचाऱ्यांना अडचणीत आणणारा असल्याचे कर्मचाऱ्यांकडून सांगितले जात आहे.
(हेही वाचा – …तर ‘लालपरी’चे प्रवासी दुरावणार!)
असं आहे हमीपत्रातील मजकूर
या हमीपत्रात असे म्हटले की, आठ नोव्हेंबर 2021 पासून सुरू झालेल्या बेकायदेशीर संप/ आंदोलनात सहभागी झालो होतो. आज दिनांकपासून कर्तव्यावर रुजू होत आहे. या पुढे संपात सहभागी होणार नाही. तसेच आंदोलन कालावधीत रजेची मागणी करणार नाही असे वचनपत्र सादर करत आहे, असा मजकूर वचनपत्रात नमूद करण्यात आला आहे. भविष्यातील संपात सहभागी झाल्यास प्रशासनाकडून होणारी कारवाई मान्य असणार आहे, असेही या वचनपत्रात म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community