विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लोणावळा येथे विविध विकासकामांचे लोकार्पण केले. लोणावळा येथे असलेल्या स्मशानभूमीचे उद्घाटन देखील देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जाहीर सभेतील भाषणात देवेंद्र फडणवीस यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्यांनी महापौर असतानाचा, नागपूर स्मशानभूमीचा किस्सा सांगितला. हा किस्सा ऐकून सभेत एकच हशा पिकला.
स्मशानभूमीच्या उद्घाटनाची भीती
स्मशानभूमीचा किस्सा सांगताना देवेंद्र फडणवीस म्हणतात, मला स्मशानभूमीचे उद्घाटन करायला भीती वाटते. नागपूरला महापौर असताना स्मशानभूमीच्या उद्घाटनाला मला बोलविण्यात आले. त्यावेळी एक डेड बॉडी आणून त्याला अग्नी माझ्या हस्ते देण्यात आला होता. त्यामुळे मला स्मशानभूमीचे उद्घाटन करायला भीती वाटत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. हे ऐकून उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. मात्र लोणावळ्यात स्मशानभूमीचे उद्घाटन करताना असे काही केलं गेलं नाही, त्यामुळे बरे वाटल्याचे देखील फडणवीस यांनी नमूद केले.
( हेही वाचा : प्रदूषणाचा विळखा! कोल्हापूरात पंचगंगेच्या पाण्याला फेस )
युगपुरूषांचे खंड प्रकाशन सुरू करा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने आपण चालतो आहे. त्याचा प्रसार पुढे ही होत रहावा, म्हणून शासनाकडून त्यांचे खंड प्रकाशित केले जातात. याआधी अल्पदरात ती विक्री केली जायची. पण अलिकडे सरकराने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांसारख्या युगपुरुषांचे साहित्य प्रकाशन बंद केले आहे. त्यामुळेच न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले. राज्य सरकार तकलादू कारणं देत आहे. युगपुरूषांचे खंड प्रकाशन सुरू करावेत, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
Join Our WhatsApp Community