अरेव्वा! प्रत्येक युद्धनौकेवर नेमणार महिला अधिकारी!

143

देशाच्या सागरी सुरक्षेसाठी नौदल सदैव तत्पर असते. नौदलात महिलांचा सहभाग वाढविण्यावर दिवसेंदिवस भर दिला जात आहे. जवळपास प्रत्येक युद्धनौकेवर महिला अधिकारी नेमण्याची तयारी सुरू असल्याचे नौदल प्रमुख ऍडमिरल आर. हरिकुमार यांनी स्पष्ट केले आहे. नौदलाच्या वर्षिक पत्रकार परिषदेला संबोधित करताना ते बोलत होते.

जबाबदारी आमची

चीनच्या आव्हानाबाबत ऍडमिरल हरिकुमार म्हणाले की, हिंदी महासागर आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आम्ही सक्षम आहोत आणि आम्ही कोणत्याही देशाकडे पाहून नव्हे, तर समुद्राची सद्यपरिस्थिती पाहून तयारी केली आहे. पश्चिम सीमेवरील आव्हान पेलण्यासाठीही आम्ही कायम सज्ज आहोत. जेव्हा पश्चिम सीमेवर समस्या निर्माण झाली, तेव्हा आमची जहाजे उभी होती. काहीही झाले तरी त्यावर आमची नजर आहे, देशातील प्रत्येक जबाबदारी आमची असल्याचेही नौदल प्रमुख ऍडमिरल आर. हरिकुमार यांनी सांगितले.

( हेही वाचा : “मुलगी पळून गेली तर, आईच जबाबदार” )

कोरोना काळातील भूमिका

कोरोना काळातील नौदलाच्या भूमिकेबद्दल स्पष्ट करताना नौदल प्रमुख म्हणाले, नेव्ही हॉस्पिटलने कोविडच्या काळात लोकांना मदत केली. नौदलाच्या १० जहाजांनी कोविडच्या काळात मित्र देशांना औषधे, लस आणि मानवतावादी मदत पोहोचवली आहे. विपरीत परिस्थितीला सामोरे जाण्यासाठीही सज्ज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ओमिक्रॉनबद्दल सूचित करताना, हरिकुमार म्हणाले, दुसऱ्या लाटेत आम्ही चांगले काम केले. तिसऱ्या लाटेला सामोरे जाण्यासाठी आमची तयारी सुरू आहे. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, औषधे, डॉक्टरांचे प्रशिक्षण सर्व काही तयार आहे. कोविडविषयक प्रोटोकॉल तयार करण्यात आला आहे, ज्याचे सर्वजण पालन करत आहेत. कोणीही रजेवरून आल्यावर प्रथम त्याची चाचणी घेतात, त्यांना क्वारंटाईन केले जाते, नंतरच त्यांना जहाजात तैनात केले जाते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.