कोरोनाच्या बदलेल्या ओमिक्रॉन या व्हेरियंटचे २८ नमुने जनुकीय क्रमनिर्धारणासाठी (जिनोमिक सिक्वेंसिंग) पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संस्था (एनआयव्ही) आणि मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयातील प्रयोगशाळेत पाठविले आहेत, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य खात्यातर्फे देण्यात आली.
२५ जण आंतरराष्ट्रीय प्रवासी
आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे क्षेत्रीय पातळीवर सर्वेक्षण सुरु केले आहे. त्याअंतर्गत विमानतळ आणि क्षेत्रीय पातळीवर सर्वेक्षण सुरू आहेत. त्यातून आतापर्यंत २८ नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविले आहेत. यापैकी १२ नमुने ‘एनआयव्ही’कडे, तर १६ नमुने कस्तुरबा रुग्णालयातील प्रयोगशाळेत तपासण्यासाठी पाठविले आहेत. या २८ जणांपैकी २५ जण आंतरराष्ट्रीय प्रवासी आहेत आणि तीन जण त्यांच्या संपर्कात आलेले नागरिक आहेत, असेही खात्यातर्फे सांगण्यात आले. मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर परदेशातून प्रवास करून आलेल्या ८६१ प्रवाशांची ‘आरटीपीसीआर’ तपासणी करण्यात आली. त्यातून तीन प्रवाशांना कोरोना झाल्याचे निदान झाले आहे. या तिघांचेही नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविले आहे, असे खात्यातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
(हेही वाचा “मुलगी पळून गेली तर, आईच जबाबदार”)
Join Our WhatsApp Community