पुढील आठ दिवसांनंतर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची कार्यवाही ठरणार

110

मुंबई महापालिकेचे २२७ प्रभागांचे २३६ प्रभाग करण्याबाबतचा निर्णय राज्य मंत्रीमंडळाच्या कॅबिनेटमध्ये घेतल्यानंतर तब्बल २५ दिवसांनंतर याची अधिसूचना महापालिकेला प्राप्त झाली आहे. त्यामुळे येत्या १० डिसेंबरपर्यंत प्रभाग रचनेचा प्रारुप आराखडा राज्य निवडणूक आयोगाला सादर करण्यात येणार असून त्यानंतर निवडणूक आयोगाच्या माध्यमातून पुढील कार्यवाही केली जाण्याची शक्यता आहे.

९ प्रभागांची वाढ

मुंबई महापालिकेच्या २०२२च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मुंबईच्या ९ प्रभागांची वाढ करत २२७ प्रभागांची संख्या २३६ एवढी करण्याचा निर्णय कॅबिनेटमध्ये करण्यात आला होता. परंतु २५ दिवसांचा कालावधी लोटल्यानंतर याची अधिसूचना महापालिकेला बुधवारी गुरुवारी प्राप्त झाली. त्यामुळे आता निवडणूक विभाग खऱ्या अर्थाने कामाला लागले आहे.

(हेही वाचा नायर रुग्णालय घटना: भाजप- शिवसेना भिडले सभागृहात)

लोकांकडून हरकती व सूचना मागवल्या जाणार

महापालिकेच्या निवडणूक विभागाच्या म्हणण्यानुसार येत्या १० डिसेंबरपर्यंत सर्व सुधारीत प्रभागांच्या रचनेचा आराखडा तयार करून राज्य निवडणूक आयोगाला सादर केला जाईल. त्यानंतर निवडणूक आयोग पुढील कार्यवाही करेल. यामध्ये प्रभागांच्या रचनेच्या आराखडा सादर केल्यानंतर प्रभागांच्या आरक्षणाची कार्यवाही केली जाईल. त्यामुळे प्रभाग रचनेनंतर त्याबाबत लोकांकडून हरकती व सूचना मागवल्या जाणार की, प्रभार रचना आणि प्रभाग आरक्षण या दोन्हीबाबत एकत्रपणे लोकांकडून हरकती व सूचना मागवल्या जाणार आहेत, याबाबतचा निर्णय निवडणूक आयोग घेणार आहे. मात्र, नियोजित वेळेत निवडणूक घेण्यासाठी सर्व प्रकारची तयारी मुंबई महापालिकेची असून निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार पुढील प्रत्येक प्रक्रिया राबवली जाईल, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.