केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या सुरक्षेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आणखी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारकडून त्यांना आता Z दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. याआधी राणे यांना Y दर्जाची सुरक्षा दिली जात होती. या नव्या सुरक्षेमुळे राणे यांच्या सुरक्षेत सीआयएसएफच्या आणखी 6 कमांडोंचा समावेश करण्यात आला आहे.
त्या घटनेच्या अहवालानंतर निर्णय
ठाकरे सरकारने राणेंना रत्नागिरीत अटक केल्यानंतर केंद्राने अहवाल मागवला होता, त्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने हा महत्वाचा निर्णय घेतला असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यांना देण्यात आलेल्या Y दर्जाच्या सुरक्षेत #CISF चे 2 कमांडो होते, आता 8 कमांडोंचे कवच त्यांच्या भवती असेल.
राज्याने सुरक्षेत केलेली कपात
नारायण राणे यांना याआधी केंद्रीय गृहमंत्रालयाकडून 19 डिसेंबर 2020 रोजी वाय दर्जाची सुरक्षा जाहीर दिली होती. त्याआधी राणे यांना राज्य सरकारकडून वाय दर्जाची सुरक्षा होती. पण राज्य सरकारकडून राणेंच्या सुरक्षेत कपात करण्यात आली होती. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्रालयाने त्यांच्या सुरक्षेचा आढावा घेतला होता. त्यानंतर राणेंना केंद्राकडून थेट वाय दर्जाची सुरक्षा जाहीर करण्यात आली होती.
Join Our WhatsApp Community