राज्याच्या विविध भागात झालेल्या अवकाळी पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. अनेक ठिकाणी रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काढणी आलेला भाजीपाल्यावरही पावसाचा, धुक्याचा गंभीर परिणाम झाला आहे. यामुळे बाजापेठत भाजीपाल्याची आवक घटली आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला चांगलीच झळ बसत आहे.
सर्वच वस्तूंचे दर वाढले
मुंबई बाजार समितीमध्येही भाजीपाल्याची आवक घटली असून, बाजारभाव वाढू लागले आहेत. काकडी, गाजर, गवार,भेंडीसह सर्वच भाज्यांचे दर वाढले आहेत. किरकोळ भाजी मंडईत सर्व भाज्या 60 ते 70 रुपये किलो आहेत. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रतिदिन 600 ते 700 ट्रक, टेम्पोमधून 3 ते साडेतीन हजार टन भाजीपाला विक्रीसाठी येत असतो. पावसामुळे शुक्रवारी 325 वाहनांमधून 2 हजार टन भाजीपाला आला. मागणीच्या तुलनेमध्ये आवक कमी असल्यामुळे अचानक सर्वच वस्तूंचे दर वाढले आहेत. पुढील काही दिवस अशीच स्थिती राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या भाज्याही महागल्या
घाऊक मंडईमध्ये 18 ते 50 रुपये किलो दराने विकल्या जाणा-या भेंडीचे दर 20 ते 70 रुपये झाले आहेत. फ्लाॅवरचे दर 14 ते 24 रुपयांवर गेले आहेत . गाजर, गवार, घेवडा, काकडी, कारली, दोडका, टोमॅटो आणि वांगीही महागली आहेत.
( हेही वाचा: दमानिया न्यायालयात गेल्या; भुजबळांच्या अडचणी वाढल्या )