कोरोना संकट काळात ऑक्सिजनची उपलब्धता आणि कोरोना मृत्यू संख्येवरून देशातील राज्यांनी शुद्ध राजकारण केल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी आज, शुक्रवारी लोकसभेत दिली.
ऑक्सिजनवरुन राजकारण केले गेले
यासंदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना मांडवीय म्हणाले की, देशात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंवर आणि ऑक्सिजनच्या उपलब्धतेवरुन मोठे राजकारण करण्यात आले. दिल्लीच्या रस्त्यांवर ऑक्सिजनचे टॅन्कर फिरत राहिले पण त्याचा वापर करण्यात आला नसल्याचे मांडवीय यांनी सांगितले. पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत सांगितले होते की, राज्यांनी कोरोनामुळे झालेल्या मृतांची आकडेवारी द्यावी, ती लपवू नये. पण राज्यांनी त्याला प्रतिसाद दिला नाही. काही राज्यांनी आवश्यकतेपेक्षा जास्त ऑक्सिजनची मागणी केली. ऑक्सिजनच्या अभावी झालेल्या मृत्यूंची संख्या पंजाब व्यतिरिक्त कोणत्याही राज्याने दिली नसल्याचेही त्यांनी सांगितले.
तीनवेळा पाठवली स्मरणपत्र
देशातील कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर लोकसभेत शुक्रवारी आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी उत्तर दिलं. गुरुवारी सुरु झालेल्या कोरोनावरील चर्चेत आरोग्यमंत्र्यांनी शुक्रवारी आपली भूमिका मांडली. एकीकडे राज्यासह देशातले आरोग्य प्रशासन सतर्क झालेय. त्यात लोकसभेतही कालपासून ओमायक्रॉनच्या धर्तीवर चर्चा सुरु आहे. त्यात काल महाविकासआघाडीच्या खासदारांनी केंद्रीय आरोग्यमंत्री आणि सरकारवर ऑक्सिजन उपलब्धतेवरुन केलेल्या टीकेला आज आरोग्यमंत्र्यांनी उत्तर दिले. परंतु, कोरोना काळात ऑक्सिजनअभावी देशात किती मृत्यू झाले हा प्रश्न आजही अनुत्तरित राहिला. केवळ पंजाब सरकारनं ऑक्सिजन अभावी 5 संशयित कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्याची कबुली दिली. केंद्रानं राज्यांना तीनवेळा स्मरणपत्र पाठवली. 19 राज्यांनी दिलेल्या उत्तरात केवळ पंजाबने 4 मृत्यू ऑक्सिजन अभावी झाल्याची कबुली दिल्याचे त्यांनी सांगितले.
( हेही वाचा: ‘अभिव्यक्ति स्वातंत्र्यावर गदा आल्यास पहिला विरोध माझा’- छगन भुजबळ )
Join Our WhatsApp Community