अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात आता सीबीआयने चौकशीचा फार्स अधिक घट्ट केला असून, सीबीआयने सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिच्या कुटुंबावर लक्ष केंद्रीत केले आहे. गुरुवारी सकाळपासूनच सीबीआयची जोरदार चौकशी सुरु असून, आता लवकरच रियाची देखील चौकशी होणार आहे. मात्र यासर्व घडामोडींवर राज्याचे राजकारण तापले असून, भाजपा आमदार आशिष शेलार यांनी नाईटलाईफ संस्कृतीचे पुरस्कर्ते तसेच ड्रग्स-पब अँड पार्टी गँगने सुशांत सिंह राजपूतचा बळी घेतल्याची टीका केली आहे. त्यामुळे त्यांचा निशाणा त्या युवामंत्र्यावर तर नाही ना अशी चर्चा आता रंगू लागली आहे.
नेमकं काय म्हणाले शेलार
नाईटलाईफ संस्कृतीचे पुरस्कर्ते तसेच ड्रग्स-पब अँड पार्टी गँगने सुशांत सिंह राजपूतचा बळी घेतला. या ड्रग्स-पब-पार्टी टोळीचे सदस्य कोण आहेत? त्यांचे संरक्षण कोण करीत आहे? मुंबई पोलिसांच्या तपासाची दिशा कोणी बदलली? ईडी आणि सीबीआय सत्य समोर आणते आहे. खरे चेहरेही समोर येतीलच! न्याय होईल असे ट्विट शेलार यांनी केली आहे.
आदीत्य ठाकरेंचा नाईट लाईफचा निर्णय
दरम्यान जानेवारी महिन्यात पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईमध्ये नाईट लाईफ बाबत निर्णय घेतला होता. तसेच मंत्रिमंडळात देखील त्याला मान्यता देण्यात आली होती. मात्र गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आक्षेप घेतला होता. मात्र यावेळी नाईट लाईफ सुरु होत असली तरी मुंबई पोलिसांवरील ताण वाढणार नाही असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले होते.
Join Our WhatsApp Community