दक्षिण आफ्रिकेत कोरोनाच्या चौथ्या लाटेसाठी कारणीभूत ठरलेल्या ऑमिक्रोन विषाणूमुळे मुंबई विमानतळावर परदेशातून आलेल्या प्रवाशांची कोरोना तपासणी वेगाने सुरु आहे. या तपासणीत शुक्रवारी अजून एका परदेशी प्रवाशाला कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे आता हा आकडा १० वर गेल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून दिली गेली.
सहसंपर्कातून कोरोनाची लागण
पालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २ डिसेंबरपर्यंत ऑमिक्रोनचा फैलाव असणा-या देशांतून ३ हजार १३६ प्रवासी आले आहेत. यापैकी २ हजार १४९ प्रवाशांची कोरोना तपासणी झाली आहे. यापैकी ४ जणांना सहसंपर्कातून कोरोनाची लागण झाली.
मुंबईबाहेरील रुग्णाला कोरोनाची लागण
कोरोनाबाधित रुग्णांमध्ये एकच ३९ वर्षीय रुग्ण दक्षिण आफ्रिकेतून २५ नोव्हेंबरला परतला आहे. ५ रुग्णांनी लंडनहून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आले आहेत. यापैकी १० नोव्हेंबर रोजी १२ वर्षीय तरुण, १७ नोव्हेंबरला ६६ वर्षीय वृद्ध, १ डिसेंबरला २५ वर्षीय तरुण, १३ नोव्हेंबरला ३४ वर्षीय इसम, तर २ डिसेंबरला ४५ वर्षीय इसम मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आले आहेत. शुक्रवारी दोन प्रवाशांमध्ये कोरोनाचे निदान झाले मात्र त्यापैकी एक रुग्ण मुंबईबाहेरील असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली. शुक्रवारी अजून दोन प्रवाशांमध्ये कोरोनाचे निदान झाले. २५ नोव्हेंबर रोजी आलेल्या १६ वर्षांच्या मुलीमध्ये तर २८ नोव्हेंबर रोजी स्पेनहून आलेल्या ४१ वर्षीय व्यक्तीची कोरोना चाचणी अहवाल सकारात्मक आला. यापैकी एकजण मुंबईबाहेरील आहे.
(हेही वाचा : विधानसभा अध्यक्षपदाची निवड हिवाळी अधिवेशनातच )
Join Our WhatsApp Community