नायर रुग्णालयात दाखल केलेल्या रुग्णाच्या उपचारात दिरंगाई केलेल्या बाळाच्या मृत्यूनंतर शनिवारी, 4 डिसेंबर रोजी सकाळी त्या बाळाच्या वडिलांचे निधन झाले. अनंत पुरी (२७) हे आगीमध्ये गंभीररित्या भाजले होते. त्यांची प्रकृती गंभीर होती. अखेर चार दिवसांच्या उपचारानंतर शनिवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास त्यांनी प्राण सोडला.
डॉक्टरांकडून दिरंगाई
वरळी बीडीडी चाळीतील घरात सिलिंडरचा स्फोट होऊन अनंत पुरी, त्यांची पत्नी विद्या पुरी(२५), मुलगा विष्णू पुरी (०५) आणि चार महिन्याचे बाळ असलेले मंगेश पुरी हे भाजले होते. त्यानंतर त्यांना नायर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यास डॉक्टरांकडून दिरंगाई झाली. याबाबतचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाल्यानंतर हे चारही रुग्ण वेदनेने विव्हळत असताना कोणत्याही प्रकारच्या हालचाली तिथे उपस्थित असलेल्या डॉक्टरांकडून केली नाही, हे पाहून प्रत्येक मुंबईकरांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. ३० नोव्हेंबरला सकाळी हा प्रकार घडल्यानंतर १ डिसेंबरला चार महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाला होता. तर अत्यंत गंभीररित्या भाजलेल्या बाळाच्या वडिलांचा मृत्यू शनिवारी सकाळी झाल्याची माहिती कस्तुरबा रुग्णालयातील बर्न वॉर्डातील सर्जन डॉ हर्षद यांनी दिली आहे. तर विद्या पुरी या ५० ते ६० टक्के भाजलेल्या असून पाच वर्षीय विष्णू पुरी हा १५ ते २० टक्के भाजला आहे. या दोघांची प्रकृती स्थिर असल्याचे कस्तुरबा रुग्णालयाच्या डॉक्टरांनी माहिती दिली आहे. त्यामुळे या आगीतील मृतांचा आकडा दोन एवढी झाली आहे.
(हेही वाचा महापालिकेचे कामगार करायला निघाले विक्रम. . .कसे जे जाणून घ्या)
Join Our WhatsApp Community