नवा रेकॉर्ड! देशात निम्मी लोकसंख्या कोरोनाचे दोन्ही डोस घेऊन लसवंत

126

गेल्या वर्षभरापासून देशात कोरोना महामारीने धुमाकूळ घातला असताना कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने दहशत निर्माण केली आहे. अशा परिस्थितीत कोरोना लसीकरणाबाबात देशाने नवा रिकॉर्ड केला आहे. दिलासादायक बाब म्हणजे देशातील लसीकरणासाठी पात्र असलेल्या निम्म्या लोकसंख्येला कोविड प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत, अशी माहिती भारत सरकारकडून देण्यात आले आहे. देशात आतापर्यंत देशव्यापी कोरोना लसीकरण मोहिमेअंतर्गत 127.61 कोटी लोकसंख्येला कोरोना विरोधी लसीचे डोस देण्यात आले आहेत.

भारताने मैलाचा दगड गाठला

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी देखील यासंदर्भात एक ट्विट केले आहे. कोराना विरुद्धच्या युद्धात भारताने आणखी एक मैलाचा दगड गाठला आहे. देशातील पात्र लोकसंख्येच्या 50 टक्के लोकांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत.

(हेही वाचा – बापरे! ओमिक्रॉनची दहशत, स्वतःच्या कुटुंबाचा डॉक्टरने घेतला जीव)

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशभरात मागील 24 तासात 8,895 कोरोनाग्रस्त आढळले. तर, 2796 जणांचा मृत्यू झाला आहे. तर देशात कोरोनाचे 99,155 अॅक्टिव्ह रूग्ण आहे. या महामारीमध्ये 4 लाख 73 हजार 326 इतक्या लोकांनी आपला जीव कोरोनामुळे गमावला आहे. दिलासादायक बाब म्हणजे, आतापर्यंत 3 कोटी 46 लाख 60 हजार 774 जणांनी कोरोनाला हरवले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत 8,895 नवीन रुग्ण आढळले आहेत. दैनंदिन पॉझिटिव्ह रेट 0.73 टक्के आहे, गेल्या 62 दिवसांपासून हा रेट 2 टक्क्यांपेक्षा कमी आहे. गेल्या 21 दिवसांपासून हा दर 1 टक्क्यांपेक्षा कमी आहे. देशात आजपर्यंत एकूण 64.72 कोटी कोरोना चाचण्या झाल्या आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.