मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे १४ डिसेंबर पासून आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दौरा करणार आहेत. याबरोबरच महाराष्ट्र नवनिर्माण सेना, समुद्र किनारा स्वच्छतेसाठी पुढाकार घेणार असून ‘समुद्र किनारा स्वच्छता मोहीम’ राबवणार आहे. या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून व्हिडिओ शेअर करत केले आहे.
मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन
महाराष्ट्राला लाभलेल्या ७२० किलोमीटर पसरलेल्या समुद्रकिनाऱ्याची निगा राखण्यात आपण कुठेतरी कमी पडतो आहे. परदेशातील समुद्र किनारे एवढे स्वच्छ व सुंदर असतात मग, आपल्या राज्यातील समुद्र किनारे असे का असू शकत नाहीत हा प्रश्न सर्वांनाच पडत असेल.यामुळेच आपण सर्वांनी एकत्र येऊन पर्यावरणाचा ऱ्हास थांबवला हवा. केवळ सरकारवर अवलंबून न राहता आपण ही जबाबदारी घेणं गरजेचं आहे. असे सांगत अमित ठाकरे यांनी ‘समुद्र किनारा स्वच्छता मोहिमेत’ सहभागी होण्याचे आवाहन तमाम जनतेला केले आहे.
( हेही वाचा : नवा रेकॉर्ड! देशात निम्मी लोकसंख्या कोरोनाचे दोन्ही डोस घेऊन लसवंत )
११ डिसेंबरला स्वच्छता मोहीम
महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेनेमार्फत दादर-माहिम येथील समुद्रकिनाऱ्यांवर सलग साडेचार वर्ष स्वच्छता मोहीम राबवून या किनाऱ्यांचा कायापालट घडवून आणला होता. आता अशीत मोहीम महाराष्ट्रातील जवळपास ४०हून अधिक समुद्रकिनाऱ्यांवर राबवली जाणार आहे. येत्या ११ डिसेंबर रोजी सकाळी १० ते १ या वेळेत महाराष्ट्रातील समुद्रकिनाऱ्यांवर राबवली जाईल. आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे समुद्रकिनारे नक्कीच स्वच्छ, सुंदर व सुरक्षित होतील अशी विश्वास अमित ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.
Join Our WhatsApp Communityमहाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील ४०हून अधिक समुद्र किनारे स्वच्छ करण्यासाठी मनसेने पुढाकार घेतला आहे. शनिवार ११ डिसेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत 'समुद्र किनारा स्वच्छता मोहीम' राबविण्यात येणार असून या मोहिमेत सहभागी होण्यासाठी आपण पुढील व्यक्तींना आवर्जून संपर्क साधावा. pic.twitter.com/HQtggBJhzr
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) December 5, 2021