नवी दिल्लीत ओमिक्रॉनचा शिरकाव, देशातील रुग्णसंख्या 5 वर

119

भारतात कोरोनाच्या नव्या व्हेरियंट ओमिक्रॉनचा संसर्ग वाढताना दिसत आहे. देशात सध्या पाच रुग्ण आढळली असून देशाची चिंता अधिक वाढली आहे. नवी दिल्लीच्या आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी यासंदर्भात माहिती देताना असे सांगितले की, दिल्लीत ओमिक्रॉनचा शिरकाव झाला आहे. ओमिक्रॉनचा संसर्ग झालेल्या वक्तीला लोकनायक जयप्रकाश नारायण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या या रूग्णावर उपचार सुरु आहेत. ओमिक्रॉनचा संसर्ग झालेला व्यक्ती 37 वर्षांचा असून त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत. या बाधित रुग्णामुळे दिल्ली प्रशासनमध्ये भितीचं वातावरण पसरलं असून प्रशासन सतर्क झाले आहे.

देशात एकूण पाच रुग्णांची नोंद

ओमिक्रॉनचा संसर्ग झालेला रुग्ण हा टांझानियातून आला असल्याची माहिती नवी दिल्लीच्या आरोग्यमंत्र्यांनी दिली. या व्यक्तीचा ओमिक्रॉनचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने आता देशातील ओमिक्रॉनचा बाधित रुग्णांची संख्या पाचवर पोहोचली आहे. सर्वात पहिल्यांदा ओमिक्रॉनने कर्नाटकमध्ये शिरकाव करत दोन जण तेथे पॉझिटिव्ह झाले. यानंतर गुजरातच्या जामनगरमध्ये आणि महाराष्ट्रात एकाला संसर्ग झाला. आता दिल्लीत एक बाधित आढळल्याने एकूण पाच रुग्णांची नोंद झाली आहे.

(हेही वाचा – नवा रेकॉर्ड! देशात निम्मी लोकसंख्या कोरोनाचे दोन्ही डोस घेऊन लसवंत)

दरम्यान, परदेशातून आलेल्या 17 जणांना दिल्लीतील लोकनायक जयप्रकाश नारायण रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला आहे. केपटाऊन शहरातून दुबईमार्गे भारतात आलेल्या या प्रवाशाला सौम्य स्वरूपाची लक्षणे असल्याने त्याची कोरोना टेस्ट करण्यात आली. ही टेस्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर त्याची जनुकीय तपासणी केली असता त्याला ओमिक्रॉनची लागण झाल्याचे शनिवारी संध्याकाळी समोर आले. ओमिक्रॉनचा संसर्ग झालेला तरुण कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील रहिवाशी असल्याची माहिती मिळतेय. तर गुजरातमध्ये आढळलेल्या रूग्णाने झिम्बॉम्बे ते दुबई ते अहमदाबाद ते जामनगर असा प्रवास केला होता. या व्यक्तीचे वय 74 वर्ष असे असून त्याला ओमिक्रॉनचा संसर्ग झाला.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.