वायफाय राऊटरसंबंधित एक संशोधन समोर आले आहे. या संशोधनावरून वायफाय राऊटरच्या सुरक्षेवर प्रश्न निर्माण करण्यात आला आहे. काही कंपन्यांचे वायफाय राऊटर हॅकर्ससाठी लक्ष्य बनले असून यामुळे वायफायच्या नेटवर्कच्या सुरक्षेवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे, अशी माहिती आयओटी इन्स्पेक्टर आणि चिप मॅगझिनला सुरक्षा संशोधकांच्या टीमने दिली आहे. या टीमने दिलेल्या माहितीनुसार, अनेक कंपन्यांचे वायफाय राऊटर धोक्यात असल्याचे समोर आले आहे. राऊटरमधील जुन्या आवृत्त्यांमधील काही घटकामुळे राऊटर हॅक करणे सोयिस्कर असल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.
‘या’ कंपन्यांचे वायफाय राऊटर धोक्यात
आयओटी इन्स्पेक्टर आणि चिप मॅगझिनला सुरक्षा संशोधकांच्या टीमच्या अहवालात असे आढळून आले की, साधारण 226 सुरक्षा त्रुटी आढळल्यानंतर कित्येक ब्रँडचे लाखो वायफाय राऊटर धोक्यात येण्याची शक्यता आहे. या नव्या संशोधन Netgear, Asus, Synology, D-Link, AVM, TP-Link आणि Edimax यासह मोठ्या ब्रँडमधील अनेक वायफाय राऊटर धोक्यात आहे. राऊटरबाबतचे नवीन संशोधन आणि निष्कर्ष संबंधित कंपन्याना कळवण्यात आल्यानंतर सर्व कंपन्यांनी प्रभावित मॉडेल्ससाठी एक उपाय शोधण्यासाठी त्वरित प्रतिसाद दिला. यामध्ये वरील सर्व कंपन्या Asus, D-Link, Edimax, Linksys, Netgear, Synology आणि TP-Link यांचा समावेश आहे.
(हेही वाचा – ‘साहित्य संमेलनाला खूप शुभेच्छा पण तेथे जाऊन तरी काय करायचे?’)
…यामुळे हॅकर्सचे काम सोपे
आयओटी इन्स्पेक्टर फ्लोरियन लुकोव्स्की यांनी या संशोधनाबाबत माहिती देतांना असे सांगितले की, करण्यात आलेल्या तपासणीदरम्यान लहान व्यवसाय आणि होम राऊटर सुरक्षेती अयशस्वी ठरले आहेत. परंतु, सर्व बग धोकादायक नसतात. करण्यात आलेल्या चाचणी दरम्यान, सर्व राऊटरने गंभीर सुरक्षा बग दाखवले. ज्यामुळे हॅकर्सचे काम सोपे होऊ शकते.