डोंबिवली शहरापाठोपाठ पुण्यात एकाच दिवशी ७ कोरोनाबाधित रुग्णांचा अहवाल ओमिक्रॉन पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. पुण्यानजीकच्या पिंपरी-चिंचवडमधील सहाजणांना तर पुण्यात एका रुग्णामध्ये ओमिक्रॉन विषाणू सापडल्याची माहिती आरोग्य विभागाने रविवारी दिली. यामध्ये दीड आणि सातवर्षाच्या मुलींचाही समावेश आहे. रविवारी राज्यातील ओमिक्रॉनची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या ८ वर पोहोचली आहे.
पिंपरी चिंचवडमधील सहा रुग्णांपैकी तीनजण नायजेरिया देशातील लेगॉस शहरातून आले होते. २४ नोव्हेंबर रोजी ४४ वर्षीय भारतीय वंशाची महिला महिला आपल्या दोन मुलींसह पिंपरी चिंचवडमध्ये राहणा-या आपल्या भावाला भेटायला आली होती. या महिलेसह तिच्या दोन मुलींना, महिलेच्या भावाला आणि भावाच्या दोन मुलींच्याही स्वॅबनमुन्यांमध्ये ओमिक्रॉन सापडल्याची माहिती पुण्यातील राष्ट्रीय विज्ञान विषाणू संस्थेनं रविवारी संध्याकाळी दिली.
तिला आणि तिच्या दोन्ही मुलींना कोरोनाची बाधा झाल्यानंतर त्यांच्या संपर्कातील १३ जणांची आरोग्य विभागानं कोरोनाची तपासणी केली. त्यावेळी तिच्या ४५ वर्षीय भावाला तसेच दीड आणि सात वर्षाच्या मुलीमध्येही ओमिक्रॉनचा विषाणू आढळून आला. नायजेरियातून आलेल्या महिलेच्या आजाराची लक्षणे सौम्य असून, इतर पाच जणांना कोणतीही लक्षणे आढळून आलेली नाहीत. या सहाजणांपैकी तिघे १८ वर्षांखालील असून, त्यांनी कोणतीही लस घेतलेली नाही. उर्वरित तिघानी लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. त्यापैकी दोघांनी कोविशिल्ड तर एकानं कोव्हॅक्सिन घेतली आहे. या सहा रुग्णांवर पिंपरीतील जिजामाता रुग्णालयावर उपचार सुरु असून, सगळ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली आहे.
पुण्यात आढळलेल्या सातव्या रुग्णानं १८ ते २५ नोव्हेंबर या काळात फिनलंडला गेला होता. २९ नोव्हेंबर रोजी त्याला ताप आल्यानं चाचणी केली असता तो कोविडबाधित आढळला. त्यानं कोविशिल्ड लसीचं दोन्ही डोस घेतले असून, त्याचीही प्रकृती स्थिर असल्याचं आरोग्य विभागानं सांगितलं आहे.
रविवारपर्यंत मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर करण्यात आलेल्या तपासणीचा तपशील
एकूण आलेले प्रवासी
– अतिजोखमीचे देश – ४ हजार ९०१
– इतर देश – २३ हजार ३२०
एकूण – २८ हजार २२
आरटीपीसीआर केलेले प्रवासी
– अतिजोखमीचे देश – ४ हजार ९०१
इतर देश ५४३
एकूण- ५ हजार ४४४
आरटीपीसीआरबाधित आणि जनुकीय तपासणीसाठीसाठी नमुने पाठवण्यात आलेले रुग्ण
अतिजोखमीचे देश – ९
इतर देश – ०
एकूण – ०
Join Our WhatsApp Community