म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या सोडतीतील विजेत्यांना दिलासा मिळाला आहे. जानेवारी २०२० ते जून २०२१ दरम्यान पात्र विजेत्यांना घराची रक्कम भरण्यासाठी वेळ मिळणार आहे. दरम्यान, मुंबई मंडळाकडून ९० दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
२६ जानेवारीपर्यंत रक्कम भरता येणार
या निर्णयामुळे पात्र विजेत्यांना २६ जानेवारी २०२० पर्यंत घराची रक्कम भरता येणार आहे. सोडतीतील पात्र विजेत्यांना घराची रक्कम भरण्यासाठी काही टप्पे ठरविण्यात आले असून एक ठरावीक मुदत देण्यात येते. या मुदतीत त्यांनी घराची रक्कम भरणे अपेक्षित असते. मात्र या मुदतीतही रक्कम न भरल्यास पात्र विजेत्यांच्या घराचे वितरण रद्द करण्याची तरतूद आहे. त्यामुळे घराची रक्कम निधारित वेळेत भरणे अत्यंत गरजेचे आहे.
(हेही वाचा- शिवप्रेमींच्या विरोधानंतर राष्ट्रपती रोप-वेने रायगडावर येणार…)
रक्कम न भरलेल्यांची घरे पालिकेच्या ताब्यात
मागील दीड ते दोन वर्षांत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक विजेते निर्धारित वेळेत घराची रक्कम भरू शकले नाहीत. त्यामध्ये मुंबई मंडळाची घरे मुंबई महानगरपालिकेने विलिनीकरणासाठी ताब्यात घेतले आहे. त्यामुळे अशा विजेत्यांना ताबा देण्यास विलंब होत आहे. यातील काही घरे मंडळाला परत मिळाली आहेत, तर काही घरे परत मिळणे बाकी आहे. त्यामुळे या सर्व बाबी लक्षात घेत मंडळाने जानेवारी २०२० ते जून २०२१ दरम्यान पात्र विजेत्यांना रक्कम भरण्यासाठी मुदतवाढ दिली आहे
Join Our WhatsApp Community