डॉ. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई लोकलकडून विशेष सेवा

142

दादरच्या चैत्यभूमीवर महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने अनुयायी दाखल झाले आहेत. आंबेडकरी अनुयायांनी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मध्यरात्रीपासूनच रांगा लावल्या आहेत. गर्दी होऊ नये तसेच कोरोनाचे नियम पाळले जावेत म्हणून पोलीस दल तैनात करण्यात आले आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कल्याण आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -पनवेल स्थानकांदरम्यान मध्य रेल्वे प्रवाशांकरीता 8 उपनगरीय विशेष गाड्या देखील सोडण्यात आल्या आहेत.

अशा आहेत विशेष लोकल ट्रेन

सेंट्रल लाईन

• कल्याण- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – विशेष कल्याण येथून 1 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे 2.30 वाजता पोहोचेल.
• कल्याण- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष कल्याण येथून 2.15 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे 3.45 वाजता पोहोचेल.

• छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कल्याण विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 1.30 वाजता सुटेल आणि कल्याण येथे 3.00 वाजता पोहोचेल.
• छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कल्याण विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 2.30 वाजता सुटेल आणि कल्याण येथे 4 वाजता पोहोचेल.

हार्बर लाइन 

• पनवेल- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष पनवेल येथून 1.15 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे 2.30 वाजता पोहोचेल.
• पनवेल- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष पनवेल येथून 2.30 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे 3.50 वाजता पोहोचेल.

• छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – पनवेल विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 1.40 वाजता सुटेल आणि पनवेल येथे 3.00 वाजता पोहोचेल.
• छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – पनवेल विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 2.40 वाजता सुटेल आणि पनवेल येथे 4.00 वाजता पोहोचेल.

शेकडो अनुयायांना चैत्यभूमीवर दाखल होण्यासाठी रेल्वेकडून विशेष ट्रेनची सुविधा उपलब्ध केली असून प्रवाशांनी ट्रेनमध्ये चढताना, प्रवास करताना आणि उतरताना कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच प्रवाशांनी योग्य तिकीट काढून प्रवास करण्याचे आवाहनही रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.