कोरोना विषाणूचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनमुळे संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. अशातचं रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचे नवे ५ रुग्ण आढळले. जिल्ह्यात उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या ३९ झाली आहे. जिल्हा शल्य चिकित्सकांनी कोरोनाविषयक अहवालात ही माहिती दिली आहे.
रविवार, ५ डिसेंबरला २४ तासांत कोरोनाचे ५ नवे रुग्ण आढळल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या ७९ हजार ११५ झाली आहे. रविवारी एकही रुग्ण कोरोनामुक्त होऊ शकला नाही. त्यामुळे आतापर्यंत बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या ७६ हजार ५८५ एवढीच आहे. कोरोनामुक्त झालेल्यांची टक्केवारी ९६.८१ आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील तपासणी अहवाल
रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या तपासणीचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या ६९३ पैकी ६९१ जणांचा अहवाल निगेटिव्ह, तर दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. रॅपिड अँटिजेन टेस्टसाठी पाठवलेल्या ३७९ नमुन्यांपैकी ३७६ जणांचा अहवाल निगेटिव्ह, तर तिघांचा पॉझिटिव्ह आला. आतापर्यंत जिल्ह्यातील आठ लाख ३९ हजार २०२ जणांची कोरोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.
३९ सक्रिय रूग्ण
जिल्ह्यात सक्रिय असलेल्या ३९ रुग्णांपैकी लक्षणे नसलेले १८, तर लक्षणे असलेले २१ रुग्ण आहेत. गृह विलगीकरणातील रुग्णांची संख्या १८, तर संस्थात्मक विलगीकरणात २१ जण आहेत. दोन रुग्णांची नोंद कोविड पोर्टलवर व्हायची बाकी आहे. अॅक्टिव्ह रुग्णांपैकी डीसीएचसीमध्ये १२, तर डीसीएचमध्ये ८ रुग्ण आहेत. सीसीसीमध्ये एकही रुग्ण नाही. बाधितांपैकी ८ जण ऑक्सिजनवर असून, एक रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहे. रविवारी दिवसभरात एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. मृतांची आतापर्यंतची एकूण संख्या २ हजार ४८९ आहे. गेल्या आठवड्यातील मृत्युदर ० टक्के होता. या आठवड्यात तो ३.१५ टक्के आहे. सक्रिय रुग्णांच्या तुलनेत मृत्युदर शून्य आहे.
जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३९, दापोली २२२, खेड २२८, गुहागर १७४, चिपळूण ४७८, संगमेश्वर २२३, रत्नागिरी ८२९, लांजा १३०, राजापूर १६६. (एकूण २ हजार ४८९).
( हेही वाचा : …तर बूस्टर डोसची गरज आहे का?, अजित पवारांची स्पष्ट भूमिका )
लसीकरणाची ८७ सत्रे
जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालानुसार कोरोनाप्रतिबंधक लसीकरणाची ८७ सत्रे झाली. त्यात २ हजार ४९६ जणांनी पहिला, तर ७,५८१ जणांनी दुसरा डोस घेतला. काल एकूण १० हजार ७७ जणांचे लसीकरण झाले. कालपर्यंत जिल्ह्यातील ९ लाख ६७ हजार ९२२ जणांचा पहिला, तर ५ लाख ७ हजार ४८५ जणांचा दुसरा डोस घेऊन झाला आहे. एकूण १४ लाख ७५ हजार ४०७ जणांचे लसीकरण झाले आहे.
Join Our WhatsApp Community