इस्लाम धर्म नव्हे, दहशतावादी गट! हिंदू धर्म स्वीकारल्यावर वसीम रिझवींचे वक्तव्य 

154

इस्लाम धर्मातून बहिष्कृत केल्यावर शिया वक्फ बोर्डाचे माजी चेअरमन वसीम रिझवी यांनी अखेर सोमवारी, ६ डिसेंबर रोजी उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील डासना मंदिरात यति नरसिंहानंद सरस्वती यांनी वसीम यांना सनातन धर्माची दीक्षा दिली. त्यानंतर रिझवी यांनी इस्लाम हा धर्म नव्हे, तर १४०० वर्षांपूर्वीचा दहशतवादी गट आहे, असे म्हटले. रिझवी यांचे नवे नाव जितेंद्र नारायणसिंह त्यागी असे ठेवण्यात आले आहे.

काय म्हणले रिझवी? 

आपल्याला इस्लाममधून बहिष्कृत केल्यावर आपण पुढे कोणता धर्म स्वीकारायचा, ही माझी मर्जी आहे. सनातन धर्म हा जगातील सर्वत पहिला धर्म आद्य धर्म असून त्यात मानवतेशी निगडीत असंख्य चांगल्या गोष्टी आहेत. आम्ही इस्लामला धर्म मानतच नाहीत. मोहम्मद साहेबांनी बनवेला इस्लाम धर्म वाचल्यानंतर आणि त्याचा दहशतवादी चेहरा पाहिल्यानंतर मला हे कळले. इस्लाम हा एखादा धर्म नाही तर एक दहशतावदी गट आहे, जो 1400 वर्षांपूर्वी अरबमध्ये तयार झाला होता. दर शुक्रवारी नमाजनंतर माझे डोके उडवण्यास सांगितले जाते. मला मुस्लिम मानण्यास त्यांना शरम वाटते. त्यामुळे मी सनातन धर्म स्वीकारत आहे.

(हेही वाचा होय, समाजप्रबोधक वीर सावरकर आणि डॉ. आंबेडकर अनेकदा भेटले होतेच!)

कोण आहेत वसीम रिझवी?

वसीम रिझवी हे उत्तर प्रदेशातील शिया वक्फ बोर्डाचे माजी चेअरमन आहेत. कुराणातील 24 आयतींवर आक्षेप घेत त्या हटवण्याची मागणी केल्यानंतर ते चर्चेत आले होते. यासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात केलेली याचिका फेटाळली गेली. 2000 साली रिझवी हे लखनऊ काश्मिरी मोहल्ल्यातून सपाच्या तिकिटावर निवडून आले होते. त्यानंतर 2008 मध्ये ते शिया वक्फ बोर्डाचे मेंबर झाले. 2012 साली त्यांची सपातून हकालपट्टी झाली. रिझवी हे आधीपासूनच कट्टरतावाद्यांच्या निशाण्यावर आहेत. कुराणातील 26 आयती मुस्लिमांमध्ये हिंसेला खतपाणी घालतात, त्या मूळ कुराणाचा भाग नव्हत्या, नंतर त्या जोडल्या गेल्या, अशी भूमिका रिझवी यांनी घेतली होती. त्यानंतर शिया आमि सुन्नी दोन्हींचे मौलवी रिझवींवर तुटून पडले होते. तसेच रिझवींचं डोकं छाटणाऱ्याला 10 लाख रुपये आणि हजची मोफत ट्रिप दिली जाईल, असं बक्षीस बरेलीची संघटना ऑल इंडिया फैजन ए मदिना कौंसिलनं जाहीर केलं.

मृत्यूनंतर अग्नि द्या 

काही दिवसांपूर्वी वसीम रिझवी यांनी मृत्यूपत्र सार्वजनिक केले होते. त्यात त्यांनी घोषणा केली होती की, माझ्या मृत्यूनंतर मला दफन न करता हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार केले जावे. तसेच माझ्या शरीराचे दहन केले जावे. यति नरसिंहानंद यांनीच माझ्या चितेला अग्नि देण्याची इच्छाही त्यांनी प्रकट केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.