महाराष्ट्रातील ओमायक्रोनचे सर्वाधिक रुग्ण पिंपरी-चिंचवडमध्ये सापडले आहे. येथे तब्बल ६ रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड प्रशासनाची झोप उडाली आहे, राज्य सरकरानेही याकडे लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी ताबडतोब उपाययोजना सुरु केली आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये ओमायक्रॉन बाधितांची संख्या वाढल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिका अधिक सतर्क झाली आहे. ओमायक्रॉनचा संसर्ग आटोक्यात आणायचा असेल तर नियमांचे पालन करण्याची आवश्यकता असल्याचे महापौर उषा ढोरे यांनी म्हटले आहे. ओमायक्रॉनला घाबरून जाण्याची आवश्यकता नसल्याचेही त्यांनी सांगितले. तर, पालिका आयुक्त राजेश पाटील यांनी परदेशातून येणाऱ्याच्या प्रत्येकाचे नमुने घेण्यात येणार असल्याचे सांगितले.
(हेही वाचा राज्य सरकारला धक्का! ओबीसी आरक्षणावरील स्थगिती कायम, अध्यादेशावरही आक्षेप)
संसर्गाला रोखणे आणि उपचारासाठी हे आहे प्लॅनिंग
- नवीन भोसरी रुग्णालय – परदेशातून आलेल्या कोरोना रुग्ण आणि ओमायक्रोनच्या रुग्णांसाठी राखीव
- नवीन जिजामाता रुग्णालय – कोरोना बाधित लहान मुलांसाठी
- थेरगाव रुग्णालय आणि कुटे रुग्णालय आकुर्डी – इतर सर्व कोरोना बाधित रुग्णांसाठी
- ऑटो क्लस्टर कोव्हीड रुग्णालय आणि जम्बो हॉस्पिटल – रुग्णांची संख्या वाढल्यास हे राखीव
- वायसीएम रुग्णालय – नॉन कोव्हीड रुग्णांसाठी राखीव