जॅकलिनला ५२ लाखांचा घोडा, ९ लाखांची मांजर आणि बरंच काही..

127

ईडीकडून २०० कोटींचा घोटाळा केल्या प्रकरणी सुकेश चंद्रशेखर याची पत्नी लीना मारियासह इतर ६ जणांविरुद्ध ७ हजार पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. मनी लॉड्रिंग प्रकरणात हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या आरोपपत्रातील दाव्यानुसार, या प्रकरणातील मुख्य आरोपी सुकेश चंद्रशेखर याने बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसवर कोट्यावधी रुपये केले खर्च केले. सुकेश चंद्रशेखर याने जॅकलिन फर्नांडिसला भेटवस्तू म्हणून तब्बल ५२ लाखांचा घोडा तर, ९ लाखांची पर्शियन मांजर भेटवस्तू म्हणून दिली.

नोरा फतेहीचाही उल्लेख

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस समवेत या आरोपपत्रात सुप्रसिद्ध नर्तिका नोरा फतेहीताही उल्लेख असून, सुकेश चंद्रशेखर याने नोराला महागडी गाडी भेट म्हणून दिल्याचे आरोपपत्रात नमूद केले आहे. परंतु नोरा हीने, मी कोणत्याच मनी लॉड्रिंगमध्ये गुंतलेली नाही असे निवेदन जारी केले होते. अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचे आरोपीसोबत प्रेमसंबंध होते असेही बोलले जात आहे.

(हेही वाचा राज्य सरकारला धक्का! ओबीसी आरक्षणावरील स्थगिती कायम, अध्यादेशावरही आक्षेप)

दोन्ही अभिनेत्रींची चौकशी 

काही दिवसांपूर्वी २०० कोटीच्या घोटाळ्याची चौकशी करण्याकरीता ईडीने दोन्ही अभिनेत्रींना समन्स बजावले होते. जॅकलिन ही आरोपी सुकेश चंद्रशेखर सोबत रिलेशनशीपमध्ये असल्याचा दावा आरोपीच्या वकिलांनी केला होता. परंतु हे सर्व आरोप खोटे असून जॅकलिनने साक्षीदार म्हणून जबाब नोंदवले आहेत. तसेच पुढील तपासात देखील जॅकलिन सहकार्य करेल असे, तिच्या व

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.