आदित्य ठाकरेंनी राजीनामा द्यावा! नितेश राणेंनी का केली मागणी?

107

वरळीतील सिलिंडर स्फोटात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. या कुटुंबाला उपचारासाठी नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु नायर रुग्णालयातील कर्मचारी उपचारात दिरंगाई करत असल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला होता. दरम्यान एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्या प्रकरणी वरळी विधानसभा आमदार आणि राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजप आमदार नितेश राणे यांनी केली आहे.

ट्विट करत राजीनामा देण्याची मागणी

वरळीतील सिलिंडरच्या स्फोटात तिसरा मृत्यू झाला आहे. आधी लहान बाळ, नंतर वडील तर आता आई असा एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. राज्य सरकारच्या निष्काळजीपणामुळे संपूर्ण कुटुंब नष्ट झाले आहे. यामुळेच वरळीचे स्थानिक आमदार आणि मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी ‘जर काही लाज उरली असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा!’, अशा शब्दांत भाजपचे आमदार नितेश राणे यांनी आगपाखड केली.

( हेही वाचा : आंबेडकर – सावरकर वैचारिक साम्यता…)

उपचारात दिरंगाई

वरळीतील बीबीडी चाळ क्रमांक ३ येथे सिलिंडरचा स्फोट झाला होता. यात चार जण गंभीररित्या जखमी झाल्यामुळे यांना उपचारासाठी नायर रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. नायर रूग्णालय कर्मचाऱ्यांनी उपचारात दिरंगाई केल्यामुळे या कुटुंबातील काही जणांना कस्तुरबा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. १ डिसेंबरला चार महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाला. यानंतर आनंद पुरी (वय 27) यांचा 4 डिसेंबर रोजी उपचार सुरू असताना मृत्यू झाला होता. तर विद्या पुरी (वय 25) यांचा ६ डिसेंबरला मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने भाजप आमदार आशिष शेलारांनीही महापालिकेवर टीका केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.