भारतात पाश्चिमात्य संस्कृतीचा पगडा वाढला आहे, यात काहीही दुमत नाही. आपल्या मुलांच्या विकासासाठी मुलांना इंग्रजी शिकवणे अनिवार्य असल्याचा ग्रह भारतातील पालकांना झाला आहे. त्यामुळे आपली मुले ही इंग्रजी माध्यमातूनच शिकली पाहिजेत, याचा अट्टाहास भारतीय पालक करताना आपण पाहिलंच असेल. पण आता चक्क विदेशी तज्ज्ञांनीच आपल्या मुलांना इंग्रजी शिकवण्याऐवजी संस्कृत श्लोक शिकवा, असं सांगितलं आहे. पाश्चिमात्य संशोधकांनी उलगडले की संस्कृत मंत्र लक्षात ठेवणारी मुले मोठी झाल्यावर अति हुशार का होतात…
स्मरणशक्ती आणि विचार क्षमता वाढते
कठोरपणे लक्षात ठेवणे मेंदूला किती मदत करू शकते, हे न्यूरोसायन्स दाखवते. 21 व्यावसायिक पात्रता असलेल्या संस्कृत पंडितांचा अभ्यास करुन जेम्स हार्टझेल या न्यूरोसायंटिस्टने ‘संस्कृत इफेक्ट’ ही संज्ञा तयार केली होती. वैदिक मंत्रांचे स्मरण केल्याने अल्प आणि दीर्घकालीन स्मृतीसह संज्ञानात्मक कार्याशी संबंधित मेंदूच्या क्षेत्रांचा आकार वाढतो. असा शोध जेम्स हार्टझेल यांनी लावला. हा शोध भारतीय परंपरेच्या श्रद्धेला पुष्टी देतो ज्यामध्ये असे मानले जाते की, मंत्रांचे स्मरण करणे आणि पाठ करणे स्मरणशक्ती आणि विचार क्षमता वाढवते.
मुलं होतात अधिक हुशार
भारतीयांना संस्कृत भाषेचे महत्त्व आणि ध्यान पद्धतींचे फायदे माहित असताना, एका परदेशी न्यूरोसायंटिस्टने असा निष्कर्ष काढणे खरचं नाट्यमय आहे. भारतीयांना संस्कृत भाषा किती महत्त्वाची आहे हे आता पाश्चात्य न्यूरोसायंटिस्टने पटवून सांगणे ही भारतीयांसाठी लज्जास्पद बाब आहे. गायत्री मंत्रासारख्या सामान्य संस्कृत मंत्रांचे थोड्या प्रमाणात जप आणि पठण करुनही आपल्या संपूर्ण मेंदूवर आश्चर्यकारक परिणाम होऊ शकतो. मुलांना आपल्या मातृभाषेत शिकवले गेल्यास त्याची बौद्धिक क्षमता वाढते असेही या सर्वेक्षणातून समोर आले आहे.
( हेही वाचा: पवार कुटुंबीय हेच खरे ओबीसींचे शत्रू! पडळकरांचा घणाघाती हल्ला )
Join Our WhatsApp Community